किमान तापमान : 25.43° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.24°से. - 26.99°से.
गुरुवार, 23 जानेवारी साफ आकाश23.54°से. - 26.57°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.37°से. - 26.9°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.24°से. - 27.36°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.79°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.72°से. - 28.15°से.
मंगळवार, 28 जानेवारी छितरे हुए बादलगुगलने संगणकशास्त्रज्ञ एलन मॅथिसन ट्यूरिंग यांच्या १०० व्या जन्मदिवसानिमित्त एक मनोरंजक आणि विचार करायला लावणारा डुडल तयार केला आहे.
गुगल आपल्या प्रत्येक डुडलमध्ये काहीतरी वेगळे प्रयोग करत असतो. यावेळीही गुगलने असाच एक भन्नाट प्रयोग केला आहे. गुगलने आपल्या डुडलमध्ये सहा टास्क दिले आहेत. जसजसे तुम्ही प्रत्येक टास्क यशस्वीपणे पूर्ण करत जाल तसतसे ॠेेसश्रश या इंग्रजी अक्षरामधील प्रत्येक शब्दामध्ये रंग भरले जातात.
गणिततज्ज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ एलन मॅथिसन ट्यूरिंग यांचा जन्म २३ जून १९१२ रोजी लंडन शहरात झाला. भारतातील ब्रिटिश राजवटीत ऍलन यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. डिजिटल संगणकावर सर्वप्रथम काम करणार्यामध्ये एलन यांचा समावेश होतो. दुसर्या महायुद्धाच्या काळात जर्मनीचे संकेतलिपीतील संदेश ‘डिकोड’कामी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. यासाठी त्यांनी कोलॉसस नावाचा संगणक बनवला होता. महायुद्धानंतर ते राष्ट्रीय प्रयोगशाळेत दाखल झाले.
संगणकाचा विकास आणि रसायनशास्त्रातील काही नव्या संकल्पना जीवशास्त्रात वापर करण्याबाबत त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. १९५० मध्ये एलन यांनी यंत्रांची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी ट्यूरिंग टेस्ट घेतली होती. १९५४ मध्ये त्यांनी सायनाइडमिश्रित सफरचंद खाऊन आत्महत्या केली.
१९५२ साली त्यांनी समलैंगिक संबंध ठेवल्याचे मान्यदेखील केले होते. समलैंगिकता त्याकाळी इंग्लंडमध्ये गुन्हा मानला जात होता. न्यायालयात एलन यांच्याविरुद्ध खटला चालवण्यात आला. एलन यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
२००९ मध्ये इंग्लंडच्या पंतप्रधानांनी एलन यांच्यावर त्याकाळी झालेल्या अत्याचाराबद्दल शोक प्रकट केला होता. एलेन ट्यूरिंग यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘ट्यूरिंग अवॉर्ड’ हा संगणक विज्ञानामधील नोबेल समजला जातो. गुगल आणि इंटेल हे या पुरस्काराचे प्रायोजक आहेत.