Posted by वृत्तभारती
Wednesday, August 7th, 2024
– भारतीय वंशाच्या न्यायमूर्तींनी दिला दणका, वॉशिंग्टन, (०७ ऑगस्ट) – अमेरिकेतील न्यायालयाने विरोधात महत्त्वाचा निकाल देत, ऑनलाईन सर्च आणि त्या संबंधित जाहिराती यातील स्पर्धा संपवण्यासाठी गुगलने बेकायदेशीर कृत्ये केल्याचे म्हटले आहे. सोमवारी देण्यात आलेला हा निकाल गुगलसाठी धक्कादायक मानला जात आहे. गुगल ज्या पद्धतीने व्यवसाय करते, त्याला प्रभावित करणारा हा निकाल आहे. भारतीय वंशाचे न्या. अमित मेहता यांनी हा निकाल दिला. बलाढ्य कंपनीला दणका दिल्यामुळे अमित मेहता चर्चेत आहेत. अमेरिकेत...
7 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, July 20th, 2024
– बाजार भांडवल घटले, वॉशिंग्टन, (२० जुन) – मायक्रोसॉफ्टच्या सेवा शुक्रवारी जगभरात ठप्प झाल्याचा फार मोठा फटका विमान, आरोग्य सेवा, शिपिंग, औद्योगिक आस्थापने, शेअर बाजार, बँका आणि वापरकर्त्यांना बसला. सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेटमध्ये झालेल्या चुकीमुळे जगभरात हे आऊटेज झाले. दरम्यान, काही तासांतच मायक्रोसॉफ्टच्या बाजार भांडवलाचे अंदाजे २३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प झाल्याचे पडसाद शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारात उमटले. डेटा इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म स्टॉकलिटिक्सच्या मते, मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत ४४३.५२...
20 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, July 19th, 2024
वॉशिंग्टन, (१९ जुन) – इस्रायल-हमास युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला मोठी धमकी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी हमासने ओलिसांना परत केले नाही तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे म्हटले आहे. गुरुवारी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला धमकी दिली आहे. त्यांनी पॅलेस्टिनी संघटना हमासला धमकी देत अध्यक्ष होण्यापूर्वी ओलीसांची सुटका केली नाही तर मोठी किंमत चुकवावी लागेल असे सांगितले....
19 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
वॉशिंग्टन, (१५ मार्च) – भारतातील नागरिकत्व कायदा (सीएए) च्या अधिसूचनेबद्दल अमेरिकेने गुरूवारी सांगितले की ते थोडेसे चिंतित आहेत आणि म्हणाले की ते या कायद्याच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी गुरुवारी आपल्या दैनंदिन ब्रीफिंगमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले की, ११ मार्चपासून नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या अधिसूचनेबद्दल आम्ही चिंतित आहोत. हा कायदा कसा लागू केला जाईल यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. धार्मिक स्वातंत्र्याचा आदर आणि कायद्यानुसार सर्व...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 4th, 2024
वॉशिंग्टन, (०४ मार्च) – या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून निक्की हेली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत आहे. दरम्यान, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया येथे झालेल्या रिपब्लिकन प्राइमरीमध्ये निक्की हेलीने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. निक्कीला ६२.९ टक्के मते मिळाली तर ट्रम्प यांना केवळ ३३.२ टक्के मते मिळाली आहे. रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकणारी निक्की हेली अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला ठरली आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत...
4 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
– पाकिस्तानने अमेरिकेला सुनावले, वॉशिंग्टन, (०२ मार्च) – ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील गैरप्रकारांची चौकशी करण्याची अमेरिकेची सूचना पाकिस्तानने फेटाळून लावली असून, आपण कोणत्याही बाहेरच्या देशाच्या आदेशापुढे झुकणार नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी शुक्रवारी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, ’कोणताही देश, एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश पाकिस्तानला सूचना देऊ शकत नाही.’ डॉन न्यूजने बलोचच्या हवाल्याने म्हटले आहे की, ’आम्ही पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींचे रक्षण करण्याचा...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 1st, 2024
– युएसआयएसपीएफ अध्यक्षांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, वॉशिंग्टन, (०१ मार्च) – यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे (युएसआयएसपीएफ) अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यांनी पीएम मोदी हे जगातील सर्वोत्तम नेते असल्याचे म्हटले आहे. माजी टेक दिग्गज चेंबर्सने सांगितले की, भारतात पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग ७६ टक्के आहे, याचा अर्थ लोक त्यांना पसंत करतात. चेंबर्सने लोकांचा विश्वास निर्माण करण्याच्या त्यांच्या (पीएम मोदींच्या) क्षमतेवरही प्रकाश टाकला. जॉन चेंबर्स म्हणाले,...
1 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 18th, 2024
न्यूयॉर्क, (१७ फेब्रुवारी) – भारताने संयुक्त राष्ट्रात सुरक्षा परिषदेबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सांगितले की, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आमूलाग्र बदल हवे आहेत. याशिवाय स्थायी व तात्पुरते अशा दोन्ही सदस्यांचा विस्तार करावा. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा परिषदेतील सुधारणांच्या मुद्द्यावर बोलताना कंबोज यांनी आपली मागणी मांडली. भारतासह असे अनेक देश आहेत जे दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी करत आहेत. मात्र,...
18 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 8th, 2024
– तीन हजार अनिवासी भारतीयांना पाठवणार, वॉशिंग्टन, (०८ फेब्रुवारी) – अमेरिकेतील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपा’ने भारतभरातील लोकांना २५ लाखांहून अधिक कॉल करून त्यांना मतदान करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करण्याची एक विस्तृत योजना आखली आहे. अमेरिकेतील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ ने तीन हजारांवर भारतीय अमेरिकन लोकांचे एक मजबूत शिष्टमंडळ पाठविण्याची योजना आखली आहे. हे शिष्टमंडळ देशभर विविध क्षमतांमध्ये पक्ष व त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील....
8 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 8th, 2024
कॅलिफोर्निया, (०७ फेब्रुवारी) – हिंदू धर्माची बदनामी करण्याचा डाव अमेरिकेत फसला आहे. खरं तर, कॅलिफोर्निया सरकारच्या ’डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल राइट्स’ या सरकारी विभागाने म्हटले आहे की, जातीवर आधारित भेदभाव हा हिंदू धर्माचा अत्यावश्यक भाग नाही. यासोबतच विभागाने २०२० मध्ये नोंदवलेल्या तक्रारीत सुधारणा केली आहे. कॅलिफोर्निया नागरी हक्क विभागाने गेल्या वर्षीच या प्रकरणापासून स्वेच्छेने स्वतःला दूर केले होते. हिंदू अमेरिकन फाऊंडेशन या अमेरिकेतील हिंदूंच्या हक्कांसाठी काम करणार्या संस्थेने एक निवेदन जारी...
8 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या प्रयत्नात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. न्यू हॅम्पशायरच्या प्राथमिक निवडणुकीत त्यांनी भारतीय वंशाच्या निक्की हेलीचा पराभव केला आहे. प्राथमिक निवडणुका जिंकून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आगामी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होण्याचा दावा बळकट झाला आहे. एक चतुर्थांश मतांची मोजणी करून, अमेरिकेतील प्रमुख वृत्तसंस्थांनी रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक ट्रम्प यांच्या बाजूने घोषित केली होती. मात्र, हेली यांनी अपेक्षेपेक्षा...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– युनोत भारताच्या स्थायी सदस्यत्वाची एलन मस्क यांनी केली भारताची वकिली, वॉशिंग्टन, (२३ जानेवारी) – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाची वकिली केली आहे. जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्रात काही मुद्यांवर बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याने भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निश्चितच स्थान मिळायला हवे, असे...
23 Jan 2024 / No Comment / Read More »