किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशवॉशिंग्टन, (१९ जुन) – इस्रायल-हमास युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला मोठी धमकी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी हमासने ओलिसांना परत केले नाही तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे म्हटले आहे. गुरुवारी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला धमकी दिली आहे. त्यांनी पॅलेस्टिनी संघटना हमासला धमकी देत अध्यक्ष होण्यापूर्वी ओलीसांची सुटका केली नाही तर मोठी किंमत चुकवावी लागेल असे सांगितले. ७ ऑक्टोबर रोजी हमासने ओलिस घेतलेल्यांमध्ये अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. ट्रम्प म्हणाले, ’आम्हाला आमचे ओलिस परत हवे आहेत. मी राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांची सुटका झाली तर बरे होईल, अन्यथा तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल.
ट्रम्प यांचे समर्थकही या प्रकरणी पाठिंबा व्यक्त करताना दिसले. ते ’त्यांना (बंधकांना) परत आणा’ अशा घोषणा देत होते. ट्रम्प समर्थक रोनेन न्यूट्राचा अमेरिकन-इस्त्रायली मुलगा ओमर यालाही हमासने ओलीस ठेवले आहे. पक्षाच्या परिषदेत बोलताना रोनेन म्हणाले की, अध्यक्ष ट्रम्प यांनी यासंदर्भात त्यांच्याशी बोलले आहे. त्यांनी सांगितले की, ’ज्यावेळी ओमरला हल्ल्यात ओलिस बनवण्यात आले, तेव्हा ट्रम्प माझ्याशी बोलले. तो अमेरिकन ओलिसांच्या सोबत आहे हे आम्हाला माहीत आहे.
शेकडो लोकांना ठेवले ओलीस
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांच्या तणावादरम्यान, गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलच्या दक्षिण भागात हल्ला केला. या हल्ल्यात १,२०० इस्रायली नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आणि हमासच्या सैनिकांनी २५१ लोकांना ओलीस ठेवले, ज्यात अनेक अमेरिकन लोक होते. काही ओलीसांची सुटका करण्यात आली आहे मात्र शेकडो ओलीस अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हमासच्या ताब्यातील गाझा शहरावर हल्ले सुरू केले, जे आतापर्यंत सुरूच आहेत. या लढाईत किमान ३८,८४८ पॅलेस्टिनी ठार झाले असून ८९,४५९ लोक जखमी झाले आहेत. ओलिसांची सुटका आणि युद्धविराम यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यात चर्चेच्या अनेक फेर्या झाल्या, ज्या आतापर्यंत अनिर्णायक ठरल्या आहेत. गाझामधील जीवित आणि मालमत्तेची हानी पाहता, इस्रायलवर सतत दबाव आहे, ज्यामध्ये त्याचा मित्र अमेरिका देखील आहे. तथापि, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणतात की, हमासचा नाश होईपर्यंत आणि ओलिसांना सुरक्षित घरी आणल्याशिवाय गाझामधील त्यांची लष्करी कारवाई संपणार नाही.