किमान तापमान : 25.43° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.24°से. - 26.16°से.
गुरुवार, 23 जानेवारी साफ आकाश23.54°से. - 26.57°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.37°से. - 26.9°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.24°से. - 27.36°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.79°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.72°से. - 28.15°से.
मंगळवार, 28 जानेवारी छितरे हुए बादल– झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान,
– पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर,
नवी दिल्ली, (१५ ऑक्टोबर) – निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरलाच निकाल लागणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
आज १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी पत्रकार परिषद घेत असल्याचं निवडणूक आयोगानं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते, तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर. निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते.
मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता काय असते?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात ९ कोटी ६३ लाख मतदार असतील. येथे ५ कोटी पुरुष मतदार आहेत. येथील एक लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर सुमारे ९६० मतदार असतील. मुंबईत मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत.
राजीव यांनी सांगितले की झारखंडमध्ये २ कोटी ६० लाख मतदार आहेत. येथे १ कोटी ३१ लाख पुरुष तर १ कोटी २९ लाख महिला मतदार आहेत. झारखंडमध्ये २९ हजार ५६२ बूथवर मतदान होणार आहे. झारखंडमध्ये प्रत्येक बूथवर ८८१ मतदार असतील.
महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत, त्यापैकी बहुमतासाठी १४५ जागा आवश्यक आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४, काँग्रेसला ४४ आणि इतरांना २९ जागा मिळाल्या होत्या.
झारखंड विधानसभा
झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) ३० जागा जिंकल्या होत्या आणि भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या, तर २६ जागा इतर पक्षांना गेल्या होत्या. निवडणुकीत झामुमो सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.
मतदानासाठी महत्त्वाच्या घोषणा
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आपले प्रयत्न राहाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. सिनिअर सिटिझन्स आणि दिव्यांग व्यक्तींना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शुटिंग केलं जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रांग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदावारांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. पैसे, मद्य, ड्रग्स वाटप्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत असावेत असं सूचना करण्यात आल्या आहेत.
पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर
उत्तर प्रदेशमध्ये १३ नोव्हेंबरला ९ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये २० नोव्हेंबरला विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.
वायनाडमध्ये १३ नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.
पोटनिवडणुकीचा निकालही २३ नोव्हेंबरला लागणार आहे.
ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित
निवडणूक आयोगाने तारखांच्या घोषणेदरम्यान ईव्हीएममध्ये कोणताही दोष नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे. ईव्हीएमच्या बॅटरीवर पोलिंग एजंटची सहीही असेल. ईव्हीएम थ्री लेयर सिक्युरिटी अंतर्गत असतील. निवडणूक आयोगाने सांगितले की, ईव्हीएममध्ये एकल वापराच्या बॅटरी असतात. ईव्हीएममध्ये मोबाईलप्रमाणे बॅटरी नसतात. विशेष म्हणजे ईव्हीएममधील गैरप्रकारांबाबत विरोधकांकडून अनेकदा विधाने केली जात आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबत सर्व काही आधीच स्पष्ट केले आहे.