किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 36 %
वायू वेग : 2.25 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.11°से. - 30.98°से.
मंगळवार, 11 मार्च27.91°से. - 29.75°से.
बुधवार, 12 मार्च27.74°से. - 29.8°से.
गुरुवार, 13 मार्च27.25°से. - 28.45°से.
शुक्रवार, 14 मार्च26.61°से. - 29.33°से.
शनिवार, 15 मार्च26.61°से. - 28.1°से.
रविवार, 16 मार्च– केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांची घोषणा,
– ८ ऑक्टोबर रोजी होणार पुरस्कार वितरण,
नवी दिल्ली, (३० सप्टेबर) – भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. सिने विश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना शासनाकडून अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणार्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. दादासाहेबांची १९१३ साली हरिश्चंद्राची फॅक्टरी नावाचा पहिला भारतीय मूकपट तयार केला. त्यांच्या अफाट कामामुळे आज भारतात चित्रपट रोवला असं म्हटलं जातं. त्यामुळे भारत सरकारने १९६९ साली दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
आपल्या कसदार अभिनयाने हिंदी सिने जगताचा सुपर स्टार ज्यांनी रसिकांवर भुरळ घातली, रसिकांच्या दिलाची धडकन म्हणून तीन दशकं मिथून चक्रवर्तींना ओळखलं जातं होतं. त्यांच्या अभिनयाचा सन्मान म्हणुन हा मोठा पुरस्कार त्यांना घोषित झाला आहे.
अश्वीनी वैष्णव यांची पोस्ट
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली असून त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मिथून चक्रवर्तींबद्दल गौरौद्गार केले आहे. खुद्द अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, मिथुन दा यांचा गौरवशाली चित्रपट प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो! हे जाहीर करताना अभिमान वाटतो की दादासाहेब फाळके निवड ज्युरीने श्री मिथुन चक्रवर्ती जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे
८ ऑक्टोबर रोजी होणार पुरस्कार वितरण
८ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार मिथून दादांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही अश्विनी यांनी दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही महिन्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याची बातमी आली आहे. एप्रिलमध्ये हा समारंभ झाला होता आणि त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सन्मान मिळाला.
काय म्हणाले मिथूनदा?
मिथुन चक्रवर्ती या सन्मानाबद्दल म्हणाले, मी खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाकडे काही मागितले नाही. जेव्हा मला गृहमंत्रालयाकडून मला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचा फोन आला, तेव्हा मी गप्प बसलो होतो. कारण मला याची अपेक्षा नव्हती.