किमान तापमान : 25.43° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.24°से. - 26.16°से.
गुरुवार, 23 जानेवारी साफ आकाश23.54°से. - 26.57°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.37°से. - 26.9°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.24°से. - 27.36°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.79°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.72°से. - 28.15°से.
मंगळवार, 28 जानेवारी छितरे हुए बादल– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन,
– जागतिक दक्षिण परिषदेला केले संबोधित,
नवी दिल्ली, (१७ ऑगस्ट) – जगात निर्माण अनिश्चिततेच्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, खाद्य आणि ऊर्जा संकट तसेच दहशतवादाच्या आव्हानाचा एकजुटीने मुकाबला करू, असे आवाहन जागतिक दक्षिणेतील देशांना केले. जागतिक दक्षिणेत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या ‘सोशल इम्पॅक्ट’ निधीसाठी भारत सुरुवातीला अडीच कोटी डॉलर्सचे योगदान देईल, असे नरेंद्र यांनी भारताने आभासी स्वरूपात आयोजित जागतिक दक्षिण परिषदेच्या उद्घाटनावेळी सांगितले.
परस्पर व्यापार, सर्वसमावेशक विकास आणि शाश्वत विकास ÷उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक दक्षिण किंवा विकसनशील देशांसोबत आपली क्षमता सामायिक करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला. जगात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे आणि कोरोना महामारीच्या प्रभावातून आपण आतापर्यंत पूर्णतः बाहेर नाही. त्यात युद्धांमुळे आव्हान निर्माण झाले आहे. आपण अगोदरच वातावरण बदलाच्या आव्हानांचा सामना करीत आहोत. आता आरोग्य, अन्न आणि ऊर्जा सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भारत जागतिक दक्षिणेचा आवाज
चला आपल्या क्षमता सामायिक करूया. आपण सर्व मिळून आपले संकल्प पूर्णत्वास नेऊया. आपण मिळून दोन समानवतेची ओळख मिळवूया, असे आवाहन मोदींनी केले. मागील काही वर्षांत जागतिक दक्षिण किंवा विकसनशील देशांच्या विशेषतः आफि‘कन खंडाच्या चिंता, आव्हाने आणि आकांक्षांना भारत आवाज देत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.