किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.84°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलबंगळूरू, (१७ ऑगस्ट) – अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची सूंदर मूर्ती घडविणार कर्नाटकच्या म्हैसूर येथील मूर्तीकार अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे बारावी जागतिक कन्नड परिषद ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या परिषदेसाठी अरुण योगीराज उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा व्हिसा नाकारला गेल्यामुळे ते आता अमेरिकेला जाऊ शकणार नाहीत. शिल्पकार अरुण योगीराज, त्यांची पत्नी आणि मुलांचा अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. मात्र, दूतावासाने व्हिसा नाकारण्याचे कारण दिलेले नाही. हा टूरिस्ट व्हिसा होता.
म्हैसूरस्थित शिल्पकाराने यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येत नव्याने बांधलेल्या मंदिरात स्थापित ‘राम लल्ला’ची मूर्ती साकारली होती. अयोध्येतील भव्य अभिषेक सोहळ्यासाठी ते निमंत्रितांपैकी एक होते. म्हैसूर विद्यापीठातून एमबीए केलेले अरुण योगीराज यांनी एका खासगी कंपनीच्या मानव संसाधन विभागात सहा महिने प्रशिक्षण घेतले, परंतु त्यांनी आपली खाजगी नोकरी सोडून कौटुंबिक परंपरा पुढे नेण्यासाठी म्हैसूरला परत आले.
अरुण योगीराज यांनी यापूर्वी केदारनाथमध्ये स्थापित केलेला आदि शंकराचारांचा १२ फूट उंच पुतळा आणि दिल्लीतील इंडिया गेटजवळ स्थापित सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही तयार केला होता. अरुण योगीराज यांनी म्हैसूर जिल्ह्यातील चुंचनकट्टे येथे २१ फूट उंच हनुमानाची मूर्ती साकारली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १५ फूट उंच पुतळा, म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा पांढरा अमृतशीला पुतळा आणि नंदीची ६ फूट उंचीची अखंड पुतळाही तयार करण्यात आला आहे.
अरुण योगीराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, व्हिसा मिळविण्यासाठी जे कागदपत्रे लागतात, ती सर्व आम्ही पुरविली होती. तरीही व्हिसा का नाकारण्यात आला, याची कोणतीही माहिती सध्या देण्यात आलेली नाही.