|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 25.43° से.

कमाल तापमान : 25.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

25.99° से.

हवामानाचा अंदाज

24.24°से. - 26.16°से.

गुरुवार, 23 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.54°से. - 26.57°से.

शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.9°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.24°से. - 27.36°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.65°से. - 27.79°से.

सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.72°से. - 28.15°से.

मंगळवार, 28 जानेवारी छितरे हुए बादल

पाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार

पाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार=जमात-उद-दावा लढणार २०० जागा, वृत्तसंस्था लाहोर, ९ जून – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदची जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात पुढील महिन्यात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात आता अतिरेक्यांचाही प्रवेश होणार आहे. पाकमध्ये येत्या २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जमात-उद-दावाने मिल्ली मुस्लिम लीग हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे, तथापि, त्याची निवडणूक आयोगात अद्याप नोंद झालेली नाही. आता...10 Jun 2018 / No Comment / Read More »

सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय… सतावणार्‍या प्रश्‍नांचा उलगडा!

सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय… सतावणार्‍या प्रश्‍नांचा उलगडा!‘‘भगव्या दहशतवादाची ही भीती निव्वळ ढोंग होती. एक प्रकारचा वेगळाच माहोल तयार करून समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्याचे ते एक षडयंत्र होते. एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करण्याच्या राजकारणाच्या चौकटीत नागरिकांना जनावरांसारखे बांधून ठेवण्याची ती एक व्यापक रणनीती होती. पण, माहिती, ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या या युगात अशा चाली कधीच सफल होत नसतात.’’ दोन दिवस… न्यायालयाचे दोन निर्णय आणि समाज व राजकारणाची दोन विभिन्न रूपरेषा…! लेफ्ट. कर्नल श्रीकांत पुरोहित यांना जामीन...3 Sep 2017 / No Comment / Read More »

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक ४४८ बळी

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक ४४८ बळी– गुजरात दुसर्‍या स्थानावर• – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अहवाल, नवी दिल्ली, २ सप्टेंबर – देशातील अनेक राज्यांना स्वाईन फ्लू या घातक आजाराचा विळखा बसला असून, या रोगाने सर्वाधिक बळी महाराष्ट्रात घेतले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीत दिसून आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४४८ नागरिकांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात देशात स्वाईन फ्ल्यूमुळे १,१०० लोकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील बळींची संख्या सर्वाधिक म्हणजे ४४८ इतकी आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये ३४३...3 Sep 2017 / No Comment / Read More »

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश=तरुणांची संख्या राहणार सर्वाधिक =अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अंदाज,  वृत्तसंस्था न्यूयॉर्क, २ मार्च – भारतातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे जगात सर्वाधिक मुस्लिम व्यक्ती भारतात राहतील, असे संकेत देणारा अहवाल  सध्या विशेष चर्चेचा विषय बनला आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज प्यू रिचर्स सेंटरने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला जगभरात ख्रिश्‍चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. २०१० पर्यंत जगभरातील...3 Mar 2017 / No Comment / Read More »

अमेरिकेच्या चुकांमुळे जगात असंख्यांचा जीव गेला

अमेरिकेच्या चुकांमुळे जगात असंख्यांचा जीव गेला►रशियाप्रमाणेच आम्हीही निर्दोष नाही : डोनाल्ड ट्रम्प, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ६ फेब्रुवारी – अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वखालील रशिया आणि यापूर्वीच्या अमेरिकेत साम्य असल्याचे नमूद करताना, अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी जाहीर कबुली दिली. यामुळे अमेरिकेतील सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या टीकेची झोड उठवली आहे. व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देखील जगात असंख्य लोकांचा बळी गेला आहे. पुतिन...7 Feb 2017 / No Comment / Read More »

आता म्हणतात, अखिलेशसाठीच प्रचार करणार

आता म्हणतात, अखिलेशसाठीच प्रचार करणार=मुलायमसिंहांचे पुन्हा घूमजाव!, वृत्तसंस्था लखनौ, ६ फेब्रुवारी – समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे तळ्यात आणि मळ्यात अजूनही सुरूच आहे. सपा-कॉंगे्रस आघाडीवर नाराजी व्यक्त करून, आपण केवळ भाऊ शिवपाल यादव यांच्यासाठीच प्रचार करणार असल्याचे ठामपणे सांगणारे नेताजी आता पुन्हा एकदा मुलायम झाले आहेत. मी फक्त माझ्या पुत्रासाठीच प्रचार करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यादव कुटुंबात आणि पक्षात कोणताही वाद नाही. अखिलेश यादव हेच उत्तरप्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे मुलायमसिंह...7 Feb 2017 / No Comment / Read More »

विषमतामुक्त समृद्ध देश हाच भाजपाचा संकल्प

विषमतामुक्त समृद्ध देश हाच भाजपाचा संकल्पमुंबई, [६ ऑक्टोबर] – सत्ता असताना कधीही जातीचे भले न करणार्‍या काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट असून पक्षाला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून असा विषमतामुक्त समृद्ध देश निर्माण करायचा आहे की, कोणाला आरक्षण मागायची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या समारोप सत्रात मुंबईत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा....7 Oct 2016 / No Comment / Read More »

तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल=मॉलेक्युलर मशिन्सचा शोध= स्टॉकहोम, [५ ऑक्टोबर] – रेणुंशी संबंधित असलेल्या मॉलेक्युलर मशिन्सचा (नॅनो मशिन्स) शोध लावल्याबद्दल फ्रान्सचे जीन पीरे सौवेज, ब्रिटिशचे जे. फ्रासेर स्टॉडर्ट आणि नेदरर्लंडचे बर्नार्ड फेरिंगा या वैज्ञानिकांना आज बुधवारी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. नियंत्रित राहील अशा पद्धतीने रेणुंची रचना आणि संश्‍लेषणाची महत्त्वाची कामगिरी या तीन वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला असून, ९ लाख ३० हजार डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप...7 Oct 2016 / No Comment / Read More »

…तर पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता

…तर पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता=शरीफांचा लष्कराला इशारा= इस्लामाबाद, [६ ऑक्टोबर] – भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे धाबे दणाणलेल्या पाकिस्तानमध्ये एक विलक्षण घडामोड झाली असून, जैश-ए-मोहम्मद व इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध दृष्टीस पडेल अशी ठोस कारवाई करा, अन्यथा जगात एकाकी पडण्याचा धोका आहे, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शक्तिशाली लष्कराला दिला आहे. मंगळवारी झालेल्या एका उच्चस्तरीय गोपनीय बैठकीत नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वातील नागरी सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकार्‍यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली, असे डॉन या पाकी...7 Oct 2016 / No Comment / Read More »

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेल

तीन ब्रिटिशांना भौतिकशास्त्राचा नोबेलस्टॉकहोम, [४ ऑक्टोबर] – आजवर अज्ञात असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मावर यशस्वी संशोधन करणार्‍या ब्रिटिशच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डेव्हिड थौलेस, डंकन हॉल्डन आणि मायकेल कोझरलित्झ अशी या वैज्ञानिकांची नावे आहेत. यावर्षी नोबेलची दारे अज्ञात जगतासाठी उघडण्यात आली आहेत. या तिन्ही वैज्ञानिकांनी आपल्या अभूतपूर्व अभ्यासासाठी अतिशय प्रगत अशा गणितीय पद्धतीचा वापर केला. यासाठी त्यांनी सुपरकंडक्टर, सुपरफ्ल्युड्‌स किंवा पातळ मॅग्नेटिक फिल्म्‌चा वापर केला. या कार्यासाठी संपूर्ण जग त्यांचे आभारी...6 Oct 2016 / No Comment / Read More »

जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात

जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात=फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा, ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव= नवी दिल्ली, [३ सप्टेंबर] – रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देणारी नवी योजना सादर केली आहे. एक रुपयापेक्षाही कमी किमतीत बीएसएनएल एक जीबी डाटा देणार आहे. बीएसएनएल ९ सप्टेंबरपासून ही योजना सुरू करत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसाठी ही योजना असणार आहे. या योजनेतर्ंगत २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा...4 Sep 2016 / No Comment / Read More »

भाजपाचे संकेतस्थळ हॅक

भाजपाचे संकेतस्थळ हॅकभोपाळ, [१९ ऑगस्ट] – मध्यप्रदेश भाजपाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सने हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपा संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर मुसलमानांना मारणे बंद करा, अशा मजकुरासोबतच पाकिस्तानचा झेंडा अपलोड करण्यात आला आहे. पाकिस्तान जिंदाबाद, काश्मीर व भारतातील मुस्लिमांना मारणे बंद करा, असा मजकूर संकेतस्थळाच्या मुख्य पानावर आज शुक्रवारी प्रसिद्ध झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही हे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते. भाजपाच्या संकेतस्थळासारखे दिसणारे हे संकेतस्थळ कुणीतरी तयार केले आहे. भाजपाचे हे...21 Aug 2016 / No Comment / Read More »