किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=शरीफांचा लष्कराला इशारा=
इस्लामाबाद, [६ ऑक्टोबर] – भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे धाबे दणाणलेल्या पाकिस्तानमध्ये एक विलक्षण घडामोड झाली असून, जैश-ए-मोहम्मद व इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध दृष्टीस पडेल अशी ठोस कारवाई करा, अन्यथा जगात एकाकी पडण्याचा धोका आहे, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शक्तिशाली लष्कराला दिला आहे.
मंगळवारी झालेल्या एका उच्चस्तरीय गोपनीय बैठकीत नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वातील नागरी सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकार्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली, असे डॉन या पाकी वृत्तपत्राने उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजनयिक स्तरावर अनेक प्रयत्न होत असले तरी जागतिक वर्तुळात पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता आहे आणि जगातील बहुतांश राजधान्यांमध्ये सरकारच्या शब्दाला फारशी किंमत दिली जात नाही, असे पाकचे परराष्ट्र सचिव एजाझ चौधरी यांनी या बैठकीत सादरीकरण करताना सांगितले.
चौधरी यांच्या या सादरीकरणानंतर नागरी सरकारने पाकच्या शक्तिशाली लष्कराला स्पष्ट संदेश दिला. कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई केल्यास लष्कराच्या नेतृत्वातील गुप्तचर संस्था त्यात हस्तक्षेप करणार नाही. याशिवाय पठाणकोट हल्ल्याचा तपास पूर्णत्वास नेण्यासह रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयात सध्या रखडलेला मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला पुन्हा सुरू करण्यात यावा, असेही यावेळी सांगण्यात आल्याचे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे.
मित्रदेश असलेल्या चीनने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला असला तरी, पाकने आपल्या भूमिकेत बदल करावा, असे सूचक संकेतही त्या देशाने दिले असल्याचे चौधरी यांनी सांगताच बैठकीत उपस्थित असलेल्यांना एकच धक्का बसला. या बैठकीनंतर आयएसआय या पाकी गुप्तचर संस्थेचे महासंचालक रिझवान अख्तर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर जांजुआ सरकारचा संदेश घेऊन सर्व चारही प्रांतांचा दौरा करणार असून, सरकारचा संदेश प्रातीय सर्वोच्च समित्या आणि आयएसआयच्या सेक्टर्स कमांडर्सला देतील, असाही निर्णय घेण्यात आला.
याच बैठकीत पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाझ शरीफ आणि आयएसआय यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली आणि यावरूनच शरीफ सरकारने आपल्या धोरणात बदल केल्याचे दिसून येते, असेही डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. नागरी प्रशासनाने विशिष्ट गटांविरुद्ध कारवाई केली की, सुरक्षा यंत्रणा अटक झालेल्यांना मुक्त करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करतात, असा आरोप शाहबाज शरीफ यांनी या बैठकीत केला.
पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, प्रांतीय अधिकारी, रिझवान अख्तर व इतर उपस्थित होते. अमेरिकेच्या बाबतीत बोलताना चौधरी म्हणाले की, दोन्ही देशांतील संंबंध बिघडले आहेत आणि हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाईच्या अमेरिकेच्या मागणीमुळे हे आणखी बिघडू शकतात. याशिवाय चिनी अधिकार्यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला तांत्रिकदृष्ट्या रोखून धरले असले तरी सातत्याने असे करण्यामागच्या तर्कावर चीनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असेही चौधरी म्हणाल्याचे डॉनच्या वृत्तात नमूद आहे.