किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भारतीय वंशाच्या न्यायमूर्तींनी दिला दणका,
वॉशिंग्टन, (०७ ऑगस्ट) – अमेरिकेतील न्यायालयाने विरोधात महत्त्वाचा निकाल देत, ऑनलाईन सर्च आणि त्या संबंधित जाहिराती यातील स्पर्धा संपवण्यासाठी गुगलने बेकायदेशीर कृत्ये केल्याचे म्हटले आहे. सोमवारी देण्यात आलेला हा निकाल गुगलसाठी धक्कादायक मानला जात आहे. गुगल ज्या पद्धतीने व्यवसाय करते, त्याला प्रभावित करणारा हा निकाल आहे.
भारतीय वंशाचे न्या. अमित मेहता यांनी हा निकाल दिला. बलाढ्य कंपनीला दणका दिल्यामुळे अमित मेहता चर्चेत आहेत. अमेरिकेत ऑनलाईन सर्चमध्ये गुगलची पूर्ण मक्तेदारी आहे. येथील ९० टक्के इंटरनेट सर्च गुगलच्या ताब्यात आहे. याविरोधात अमेरिकेच्या कायदा विभागाने २०२० मध्ये खटला दाखल केला होता. याशिवाय इतरही खटले दाखल आहेत. अमेरिकेत एकाधिकारशाही विरोधातील कायदे कडक आहेत.
या निकालात गुगल तसेच गुगलची कंपनी अल्फाबेटवर काय दंड आकारण्यात येणार आहे, यासंदर्भातील माहिती उपलब्ध झालेली नाही. पुढील सुनावणीत दंड आणि इतर सुधारणा यावर निकाल अपेक्षित आहे. गुगलने अॅपल आणि इतर कंपन्यांना त्याच्या उपकरणांवर गुगल हे डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी अब्जावधी रुपये दिल्याचे या सुनावणीत निष्पन्न झाले आहे.
अमित मेहता गुजरातमधील
अमित मेहता यांचे गुजरात येथील आहे. अमित एक वर्षांचे होते तेव्हाच त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले. अमित मेहता यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत जॉर्जटाऊन विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्यातील उच्च शिक्षण व्हर्जिनिया स्कूल ऑफ लॉ येथून केले. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नामवंत अशा कायदेविषय संस्थांसोबत काम केले. २००७ त्यांची नियुक्ती कोलंबिया जिल्ह्याचे न्यायमूर्ती म्हणून झाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटोल दंगली प्रकरणातील दिवाणी खटला रद्द होण्यासाठी याचिका दाखल केली होती. अमित मेहता यांनी फेटाळली होती.