|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.37° से.

कमाल तापमान : 28.78° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 38 %

वायू वेग : 1.8 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.78° से.

हवामानाचा अंदाज

24.63°से. - 28.99°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.64°से. - 28.58°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.31°से. - 27.67°से.

रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.5°से. - 28.1°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.59°से. - 28.16°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.22°से. - 28.9°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल

इसिसच्या आणखी एका अतिरेक्याला एनआयएने पुण्यात केली अटक

इसिसच्या आणखी एका अतिरेक्याला एनआयएने पुण्यात केली अटक-एनआयएने उद्ध्वस्त केले महाराष्ट्रातील मोड्यूल, पुणे, (०३ नोव्हेंबर) – इसिसच्या आणखी एका अतिरेक्याला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने येथे अटक करीत या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील मोड्यूल उद्ध्वस्त केले. इसिसचे अतिरेकी शस्त्र चालवणे आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याचे समोर आले आहे. पुणे इसिस मोड्यूल प्रकरणात ही आठवी अटक आहे. महंमद शाहनवाज आलम असे अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे नाव असून तो मूळचा झारखंड येथील आहे. पुणे इसिस मोड्यूल प्रकरणात सध्या अटक...4 Nov 2023 / No Comment / Read More »

सायबर गुन्ह्यांसंदर्भात कडक कायदे करण्यासाठी पावले उचलली जातील

सायबर गुन्ह्यांसंदर्भात कडक कायदे करण्यासाठी पावले उचलली जातील– चंद्रकांत पाटील यांची ग्वाही, पुणे, (०१ नोव्हेंबर) – सायबर गुन्हे कसे घडतात तसेच ते कसे टाळता येतील, याचे महत्त्वपूर्ण विवेचन संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूरलिखित ‘सायबर धोके आणि उपाययोजना’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येने अडकत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असल्याने सायबर गुन्ह्यांसंदर्भात कडक कायदे करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली....1 Nov 2023 / No Comment / Read More »

देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे योगदान आवश्यक

देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे योगदान आवश्यक– केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे आवाहन, पुणे, (२८ ऑक्टोबर) – सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी समजून त्या माध्यमातून देशाच्या विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय रेल्वे , कोळसा आणि खाण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज केले. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या भारतीय रेल्वे सिव्हील इंजिनियरिंग इन्स्टिट्युट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एकंदर ८० जणांना यावेळी...29 Oct 2023 / No Comment / Read More »

दगडूशेठ गणपतीच्या मंडपात ३१,००० महिलांचे अथर्वशीर्ष पठण

दगडूशेठ गणपतीच्या मंडपात ३१,००० महिलांचे अथर्वशीर्ष पठणपुणे, (२०सप्टेंबर) – महाराष्ट्रातील गणेश चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती पंडालमध्ये ३१,००० हून अधिक महिलांनी ’अथर्वशीर्ष’ पठण केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने त्यांच्या गणेश उत्सवातील अथर्वशीर्ष पठणाचे हे ३६ वे वर्ष असल्याची माहिती दिली. अथर्वशीर्ष हे संस्कृतमध्ये लिहिलेले उपनिषद आहे, जे भगवान ग्रेशांना समर्पित आहे. या पाठादरम्यान दगडूशेठ गणपती पंडालसमोर पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या सर्व महिलांनी अथर्वशीर्षाचा जयघोष केला. यंदा पंडालची थीम अयोध्येच्या राम मंदिरावर ठेवण्यात आली...21 Sep 2023 / No Comment / Read More »

एनआयएने जाहीर केले चार अतिरेक्यांवर बक्षीस

एनआयएने जाहीर केले चार अतिरेक्यांवर बक्षीस– पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरण, मुंबई, (१२ सप्टेंबर) – पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणातील चार फरार अतिरेक्यांच्या माहितीसाठी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती अधिकार्याने मंगळवारी दिली. मोहम्मद शाहनवाझ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल अली, अब्दुल्ला फैयाझ शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान अशी या फरार अतिरेक्यांची नावे आहेत. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे एनआयएने सांगितले. एनआयएने नुकतीच पुण्यातील मॉड्युलचा एक...12 Sep 2023 / No Comment / Read More »

दोन दहशतवाद्यांना पुण्यातून अटक

दोन दहशतवाद्यांना पुण्यातून अटकजयपूर, (२९ ऑगस्ट) – राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दहशत माजवण्याच्या कटात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनएनआय) अखेर महाराष्ट्रातून अटक केली आहे. हे दोन्ही दहशतवादी मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी असून ते आयएसआयएस प्रेरीत अलसुफाचे सक्रिय दहशतवादी आहेत. हे दोन्ही आयईडी स्फोटक बनवण्याचा ट्रेंड आहे. यासोबतच तो आपल्या सहकार्‍यांना आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण देत असे. त्यासाठी तो महाराष्ट्रात पुण्यात आयईडी बनवण्याचे आणि स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी दोन शिबिरेही चालवत होता....29 Aug 2023 / No Comment / Read More »

एमआयटी समूहाचे ‘विश्वप्रयाग विद्यापीठ’ लवकरच सोलापुरात

एमआयटी समूहाचे ‘विश्वप्रयाग विद्यापीठ’ लवकरच सोलापुरात– प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, सोलापूर, (२५ ऑगस्ट) – माईंर्सं एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईंर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली 40 वर्षे मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरुण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. अशा या समूहाच्या माध्यमातून सोलापूर येथे एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाची सुरुवात येत्या 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र...25 Aug 2023 / No Comment / Read More »

कोल्हापुर दंगल: टिपू सुलतानचा स्टेटस, हिंसाचार भडकला

कोल्हापुर दंगल: टिपू सुलतानचा स्टेटस, हिंसाचार भडकलाटिपू सुलतान स्टेटस पोस्ट करणाऱ्या एकाला अटक, कोल्हापुर, (१३ जून) – टिपू सुलतानचे छायाचित्र हे आता कोल्हापुरातील दंगलीचे नवे कारण बनले आहे. टिपू सुलतानचा फोटो सोशल मीडियावर स्टेटस म्हणून पोस्ट करून त्याला भारताचा राजा म्हणणाऱ्या कोल्हापुरातील कागल शहरातील एका रहिवाशाला अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. टिपू सुलतानचे छायाचित्र हे कोल्हापुरातील दंगलीचे कारण असल्याचे कागल पोलिसांचे म्हणणे आहे....13 Jun 2023 / No Comment / Read More »

समाज माध्यमांवरून धार्मिक तेढ निर्माण केल्यास पाच वर्षे कारावास

समाज माध्यमांवरून धार्मिक तेढ निर्माण केल्यास पाच वर्षे कारावाससोलापूर, (१० जून) – समाज माध्यम किंवा दुसर्या माध्यमातून समाजात जातीय तेथ किंवा धार्मिक भावना भडकवल्यास अशा आरोपीवर थेट कारवाई करीत त्याला भादंविच्या कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि कलम ५०५ व ५०७ अंतर्गत किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन सोलापूर पोलिसांनी केले आहे. राज्यात अनेक शहरांत समाज माध्यमाद्वारे कायदा आणि सुव्यस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. अपप्रवृत्ती याचा प्रभावी फायदा घेत आहे....11 Jun 2023 / No Comment / Read More »

हिंसाचारानंतर कोल्हापूर पूर्वपदावर

हिंसाचारानंतर कोल्हापूर पूर्वपदावर– पोलिस बंदोबस्त कायम, – इंटरनेट सेवा टप्प्याटप्प्याने सुरू, पुणे, (९ जून) – कोल्हापूर शहरात टिपू सुलतानच्या फोटोचा कथित वापर आणि काही स्थानिकांकडून समाज माध्यमावर स्टेटस म्हणून आक्षेपार्ह ऑडिओ संदेशाच्या विरोधात निदर्शनादरम्यान नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर शहरात लोकांनी दैनंदिन व्यवहार पूर्ववत् सुरू केले आहेत. असे असले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त कायम असून, संपूर्ण शहरात विशेषत: संवेदनशील ठिकाणी मोठ्या सं‘येने पोलिस तैनात आहेत. हिंसाचारानंतर बंद करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा हळूहळू...9 Jun 2023 / No Comment / Read More »

कोल्हापुरात हिंसाचारानंतर ३६ अटकेत; इंटरनेट बंदी कायम

कोल्हापुरात हिंसाचारानंतर ३६ अटकेत; इंटरनेट बंदी कायमकोल्हापूर, (८ जून) – महाराष्ट्रातील कोल्हापुरात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३६ जणांना अटक केली आहे. त्यापैकी २ अल्पवयीन आहेत. त्याचवेळी प्रशासनाने परिसरात इंटरनेटवर बंदी घातली असून कलम १४४ लागू केले आहे. याशिवाय सोशल मीडियावर औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी २ एफआयआर नोंदवले होते. या दोन्ही एफआयआरमध्ये एकूण ५ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून त्यांना बाल न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. टिपू सुलतानच्या चित्रासह आक्षेपार्ह...8 Jun 2023 / No Comment / Read More »

कोल्हापुरात हिंसाचार; १९ जूनपर्यंत संचारबंदी

कोल्हापुरात हिंसाचार; १९ जूनपर्यंत संचारबंदीकोल्हापूर, (८ जून) – शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस लावल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. पोस्टविरोधात आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या मांडला. तर त्याचवेळी आंदोलकांकडून दगडफेक आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. दरम्यान पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट किंवा स्टेटस व्हायरल होऊन कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते....8 Jun 2023 / No Comment / Read More »