किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल-एनआयएने उद्ध्वस्त केले महाराष्ट्रातील मोड्यूल,
पुणे, (०३ नोव्हेंबर) – इसिसच्या आणखी एका अतिरेक्याला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने येथे अटक करीत या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील मोड्यूल उद्ध्वस्त केले. इसिसचे अतिरेकी शस्त्र चालवणे आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याचे समोर आले आहे. पुणे इसिस मोड्यूल प्रकरणात ही आठवी अटक आहे. महंमद शाहनवाज आलम असे अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे नाव असून तो मूळचा झारखंड येथील आहे. पुणे इसिस मोड्यूल प्रकरणात सध्या अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाज आलमचा थेट संबंध होता.
लपण्याचे ठिकाण शोधणे, शस्त्रे चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन अतिरेक्यांना अटक करण्यात आली, तेव्हा आलम पसार झाला होता. या प्रकरणी एनआयएने आतापर्यंत झुल्फिकार अली बारुदवाला, सिमाब नासिरुद्दिन काझी, अब्दुल कादिर पठाण, शामिल साकिब नाचन, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनुस साकी आणि डॉ. अदनान अली सरकारला अटक केली आहे. दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनुस साकीला रंगेहाथ अटक केली होती. त्यावेळी आलमने पळ काढला होता. नंतर हे तिघेही इसिसचे अतिरेकी असल्याचे समोर आले होते.
आलम पाकिस्तानी सूत्रधारांच्या संपर्कात
आलम इसिसच्या मोड्यूलशी संबंध असल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान त्याने गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फरतुल्ला गौरी आणि त्याचा जावई शाहिद फैसलच्या संपर्कात असल्याचे सांगितले. तो पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या आश्रयाने राहत असल्याचे उघड झाले आहे.