किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादलसोलापूर, (१० जून) – समाज माध्यम किंवा दुसर्या माध्यमातून समाजात जातीय तेथ किंवा धार्मिक भावना भडकवल्यास अशा आरोपीवर थेट कारवाई करीत त्याला भादंविच्या कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि कलम ५०५ व ५०७ अंतर्गत किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन सोलापूर पोलिसांनी केले आहे. राज्यात अनेक शहरांत समाज माध्यमाद्वारे कायदा आणि सुव्यस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. अपप्रवृत्ती याचा प्रभावी फायदा घेत आहे. यामुळे अशा बाबींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर असून, सायबर पोलिसांकडूनही संशयास्पद व्यक्तींच्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवरील खात्यांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
एखाद्याने समाज माध्यमांवर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली तसेच ग्रुपवर त्याला प्रतिसाद दिला तर, अशांवर कायद्याने कठोर पावले उचलली जाऊ शकतात. कलम १५३ (अ) नुसार आरोपीला या प्रकरणी तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. एखाद्याने दोन समाजात किंवा धर्मांमध्ये तेढ निर्माण केली किंवा अफवा पसरवल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून अशा आरोपीवर कलम ५०५ नुसार तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. जर एखाद्याने एखाद्या विरोधात खोटा मेसेज बनवून त्याला धमकावल्यास कलम ५०७ अंतर्गत दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शहानिशा न करता असा मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल केल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असे आवाहन सोलापूरचे पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.