|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.42° से.

कमाल तापमान : 31.8° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 50 %

वायू वेग : 5.41 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

31.8° से.

हवामानाचा अंदाज

27.28°से. - 32.99°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

26.7°से. - 30.57°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.81°से. - 29.87°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.37°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.19°से. - 29.85°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.22°से. - 29.93°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

सायबर गुन्ह्यांसंदर्भात कडक कायदे करण्यासाठी पावले उचलली जातील

सायबर गुन्ह्यांसंदर्भात कडक कायदे करण्यासाठी पावले उचलली जातील– चंद्रकांत पाटील यांची ग्वाही, पुणे, (०१ नोव्हेंबर) – सायबर गुन्हे कसे घडतात तसेच ते कसे टाळता येतील, याचे महत्त्वपूर्ण विवेचन संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूरलिखित ‘सायबर धोके आणि उपाययोजना’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येने अडकत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असल्याने सायबर गुन्ह्यांसंदर्भात कडक कायदे करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली....1 Nov 2023 / No Comment / Read More »

देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे योगदान आवश्यक

देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे योगदान आवश्यक– केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे आवाहन, पुणे, (२८ ऑक्टोबर) – सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी समजून त्या माध्यमातून देशाच्या विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय रेल्वे , कोळसा आणि खाण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज केले. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या भारतीय रेल्वे सिव्हील इंजिनियरिंग इन्स्टिट्युट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एकंदर ८० जणांना यावेळी...29 Oct 2023 / No Comment / Read More »

दगडूशेठ गणपतीच्या मंडपात ३१,००० महिलांचे अथर्वशीर्ष पठण

दगडूशेठ गणपतीच्या मंडपात ३१,००० महिलांचे अथर्वशीर्ष पठणपुणे, (२०सप्टेंबर) – महाराष्ट्रातील गणेश चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती पंडालमध्ये ३१,००० हून अधिक महिलांनी ’अथर्वशीर्ष’ पठण केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने त्यांच्या गणेश उत्सवातील अथर्वशीर्ष पठणाचे हे ३६ वे वर्ष असल्याची माहिती दिली. अथर्वशीर्ष हे संस्कृतमध्ये लिहिलेले उपनिषद आहे, जे भगवान ग्रेशांना समर्पित आहे. या पाठादरम्यान दगडूशेठ गणपती पंडालसमोर पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या सर्व महिलांनी अथर्वशीर्षाचा जयघोष केला. यंदा पंडालची थीम अयोध्येच्या राम मंदिरावर ठेवण्यात आली...21 Sep 2023 / No Comment / Read More »

कोल्हापुर दंगल: टिपू सुलतानचा स्टेटस, हिंसाचार भडकला

कोल्हापुर दंगल: टिपू सुलतानचा स्टेटस, हिंसाचार भडकलाटिपू सुलतान स्टेटस पोस्ट करणाऱ्या एकाला अटक, कोल्हापुर, (१३ जून) – टिपू सुलतानचे छायाचित्र हे आता कोल्हापुरातील दंगलीचे नवे कारण बनले आहे. टिपू सुलतानचा फोटो सोशल मीडियावर स्टेटस म्हणून पोस्ट करून त्याला भारताचा राजा म्हणणाऱ्या कोल्हापुरातील कागल शहरातील एका रहिवाशाला अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. टिपू सुलतानचे छायाचित्र हे कोल्हापुरातील दंगलीचे कारण असल्याचे कागल पोलिसांचे म्हणणे आहे....13 Jun 2023 / No Comment / Read More »

समाज माध्यमांवरून धार्मिक तेढ निर्माण केल्यास पाच वर्षे कारावास

समाज माध्यमांवरून धार्मिक तेढ निर्माण केल्यास पाच वर्षे कारावाससोलापूर, (१० जून) – समाज माध्यम किंवा दुसर्या माध्यमातून समाजात जातीय तेथ किंवा धार्मिक भावना भडकवल्यास अशा आरोपीवर थेट कारवाई करीत त्याला भादंविच्या कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि कलम ५०५ व ५०७ अंतर्गत किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन सोलापूर पोलिसांनी केले आहे. राज्यात अनेक शहरांत समाज माध्यमाद्वारे कायदा आणि सुव्यस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. अपप्रवृत्ती याचा प्रभावी फायदा घेत आहे....11 Jun 2023 / No Comment / Read More »

हिंसाचारानंतर कोल्हापूर पूर्वपदावर

हिंसाचारानंतर कोल्हापूर पूर्वपदावर– पोलिस बंदोबस्त कायम, – इंटरनेट सेवा टप्प्याटप्प्याने सुरू, पुणे, (९ जून) – कोल्हापूर शहरात टिपू सुलतानच्या फोटोचा कथित वापर आणि काही स्थानिकांकडून समाज माध्यमावर स्टेटस म्हणून आक्षेपार्ह ऑडिओ संदेशाच्या विरोधात निदर्शनादरम्यान नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर शहरात लोकांनी दैनंदिन व्यवहार पूर्ववत् सुरू केले आहेत. असे असले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त कायम असून, संपूर्ण शहरात विशेषत: संवेदनशील ठिकाणी मोठ्या सं‘येने पोलिस तैनात आहेत. हिंसाचारानंतर बंद करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा हळूहळू...9 Jun 2023 / No Comment / Read More »

कोल्हापुरात हिंसाचारानंतर ३६ अटकेत; इंटरनेट बंदी कायम

कोल्हापुरात हिंसाचारानंतर ३६ अटकेत; इंटरनेट बंदी कायमकोल्हापूर, (८ जून) – महाराष्ट्रातील कोल्हापुरात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३६ जणांना अटक केली आहे. त्यापैकी २ अल्पवयीन आहेत. त्याचवेळी प्रशासनाने परिसरात इंटरनेटवर बंदी घातली असून कलम १४४ लागू केले आहे. याशिवाय सोशल मीडियावर औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी २ एफआयआर नोंदवले होते. या दोन्ही एफआयआरमध्ये एकूण ५ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून त्यांना बाल न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. टिपू सुलतानच्या चित्रासह आक्षेपार्ह...8 Jun 2023 / No Comment / Read More »

कोल्हापुरात हिंसाचार; १९ जूनपर्यंत संचारबंदी

कोल्हापुरात हिंसाचार; १९ जूनपर्यंत संचारबंदीकोल्हापूर, (८ जून) – शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस लावल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. पोस्टविरोधात आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या मांडला. तर त्याचवेळी आंदोलकांकडून दगडफेक आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. दरम्यान पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट किंवा स्टेटस व्हायरल होऊन कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते....8 Jun 2023 / No Comment / Read More »

पुण्याच्या शाळेत पीएफआयकडून कट्टरवादाचे प्रशिक्षण

पुण्याच्या शाळेत पीएफआयकडून कट्टरवादाचे प्रशिक्षण– एनआयएने जप्त केले दोन मजले, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – मुस्लिम युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) पुण्यातील शालेय इमारतीचा भाग वापरला जात होता. हा भाग जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने सोमवारी दिली. पुण्यातील ब्ल्यू बेल शाळेचा चौथा आणि पाचवा मजला रविवारी जप्त करण्यात आला. या परिसरात पीएफआय मुस्लिम युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देत होती. २०४७ पर्यंत देशात इस्लामी सत्ता...17 Apr 2023 / No Comment / Read More »

साडेपाच कोटींचा ’अ‍ॅम्बरग्रीस’ जप्त!

साडेपाच कोटींचा ’अ‍ॅम्बरग्रीस’ जप्त!सांगली, (९ फेब्रुवारी ) – महाराष्ट्रातील सांगली शहरात पोलिसांनी ५.५ कोटी रुपये किमतीची ’अ‍ॅम्बरग्रीस’ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रातील या नगरात दोन जण विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली या दोघांनी आपल्या एका साथीदाराच्या मदतीने राज्याच्या किनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून ही ’अ‍ॅम्बरग्रीस’ आणल्याचे पोलिसांना सांगितले. परफ्युमरीमध्ये वापरल्या जाणार्‍या ’अ‍ॅम्बरग्रीस’च्या विक्रीवर आणि ताब्यात घेण्यावर वन्यजीव संरक्षण...9 Feb 2023 / No Comment / Read More »

अश्विनी जगताप, हेमंत रासने यांना भाजपाची उमेदवारी

अश्विनी जगताप, हेमंत रासने यांना भाजपाची उमेदवारी– पुण्यातील विधानसभा पोटनिवडणूक, नवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – महाराष्ट्रातून विधानसभेच्या दोन जागांसाठी होणार्या पोटीनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड मतदारसंघातून भाजपाने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तर, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे. पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप तसेच कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. या दोन्ही मतदारसंघात २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत असून, २ मार्चला मतमोजणी होणार...4 Feb 2023 / No Comment / Read More »

ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू होईल : प्रफुल्ल केतकर

ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू होईल : प्रफुल्ल केतकर– प्रबोधन मंचच्या व्याख्यानात प्रतिपादन, पुणे, (३१ जानेवारी) – महाशक्ती आणि विश्वगुरू या दोन संकल्पनांमध्ये फरक असून, आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि ऑर्गनायझर साप्ताहिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी येथे केले. प्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने ’भारत या संकल्पनेपुढील सद्यकालीन आव्हाने’ या विषयावर आयोजित व्याख्यानात केतकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार तसेच कार्यवाह किशोर शशितल उपस्थित होते. प्रफुल्ल केतकर म्हणाले की,...31 Jan 2023 / No Comment / Read More »