किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल– पोलिस बंदोबस्त कायम,
– इंटरनेट सेवा टप्प्याटप्प्याने सुरू,
पुणे, (९ जून) – कोल्हापूर शहरात टिपू सुलतानच्या फोटोचा कथित वापर आणि काही स्थानिकांकडून समाज माध्यमावर स्टेटस म्हणून आक्षेपार्ह ऑडिओ संदेशाच्या विरोधात निदर्शनादरम्यान नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर शहरात लोकांनी दैनंदिन व्यवहार पूर्ववत् सुरू केले आहेत. असे असले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त कायम असून, संपूर्ण शहरात विशेषत: संवेदनशील ठिकाणी मोठ्या सं‘येने पोलिस तैनात आहेत.
हिंसाचारानंतर बंद करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा हळूहळू पुन्हा सुरू केल्या जात आहेत. दोन जणांनी म्हैसूरचा शासक टिपू सुलतानचा फोटो आणि आक्षेपार्ह ऑडिओ संदेश त्यांच्या समाज माध्यमावर टाकल्यानंतर मंगळवारी शहरात तणाव निर्माण झाला. दुसर्या दिवशी या घटनेच्या विरोधात शिवाजी चौकात झालेल्या निदर्शनांदरम्यान शेकडो आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. हिंसाचार प्रकरणी किमान ३६ जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की, परिस्थिती पूर्वपदावर येत असून, शहरात दैनंदिन कामकाज सुरू आहे. इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आदेश शुक‘वारी सकाळी १० वाजेपर्यंत लागू होता. इंटरनेट सेवा पुरवठादारांच्या नोडल अधिकार्यांना या आदेशाद्वारे आधीच कळवण्यात आले आहे. परंतु, सर्व सेवा टॉवर पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे ते म्हणाले.
आणखी काही लोकांची ओळख पटली असली तरी, ते अद्याप फरार आहेत. ज्या ठिकाणी हिंसाचार झाला, तेथील आजूबाजूच्या दुकानांमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज आम्ही तपासत आहोत. संशयितांची ओळख पटविण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. एकूण ६० पोलिस अधिकारी आणि ३०० इतर कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात १ हजारहून अधिक होमगार्ड तैनात आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्याचे पंडित यांनी सांगितले.