|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:11 पी एम
हवामान

किमान तापमान : 21.99° से.

कमाल तापमान : 22.52° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

21.99° से.

हवामानाचा अंदाज

21.99°से. - 25.37°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.3°से. - 27.19°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.18°से. - 26.01°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.95°से. - 25.33°से.

गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.73°से. - 25.86°से.

शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.32°से. - 26.84°से.

शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल
Home »

मानाच्या पालख्या पंढरीत दाखल

मानाच्या पालख्या पंढरीत दाखलपुणे, १९ जुलै – आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचे आज सोमवारी पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. पंढरीच्या वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. या मानाच्या पालखीचे आज पहाटे मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने प्रस्थान झाले. सायंकाळी उशीरा या पालख्या पंढरीत दाखल झाल्या. ३० वारकर्‍यांनाच पालखीसोबत चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर काही वेळातच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सजविलेल्या दोन शिवशाही...20 Jul 2021 / No Comment / Read More »

पुण्यातील रसायन कंपनीला भीषण आग; १८ जणांचा मृत्यू

पुण्यातील रसायन कंपनीला भीषण आग; १८ जणांचा मृत्यूमृत्युमुखी पडलेल्यांत बहुतांश महिला, पुणे, ७ जून – पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एसव्हीएस रसायन कंपनीला आज सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात १५ महिलांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मुळशीतील अरवडे गावाजवळील एसव्हीएस कंपनीला आज दुपारी दोन वाजताच्या सुमास भीषण आग लागली. यावेळी बहुतांश महिलांसह जवळपास ३७ मजूर काम करीत होते. यात १५ महिला आणि...7 Jun 2021 / No Comment / Read More »

पुणे, सांगलीतील व्यापार्‍यांची निदर्शने

पुणे, सांगलीतील व्यापार्‍यांची निदर्शनेदुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयास विरोध, पुणे/ सांगली, ८ एप्रिल – राज्य सरकारने लावलेल्या कोरोनासंबंधी कडक निर्बंधांचा निषेध करीत पुणे, सातार्‍यातील व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी हाती फलक घेत सरकारविरोधात ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊनसे मरेंगे हम’ अशा स्वरूपाची घोषणाबाजी केली. पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकीज ते क्वार्टर गेट या अडीच किमीच्या परिसरात ८ ते १० हजार व्यापारी रस्त्याच्या दुतर्फा हाती फलक घेऊन उभे होते. आम्हाला विरोधकांची फूस...8 Apr 2021 / No Comment / Read More »

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगितमुंबई, ७ मार्च – २६ ते २८ मार्च या कालावधीत नाशिक येथे होऊ घातलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. कोरोना प्रार्दुभावाच्या पृष्ठभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. आता हे संमेलन मे महिन्यात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संमेलनासाठी जवळपास सर्व तयारी झाली होती. अनेक साहित्यिकांना निमंत्रणे पाठविण्यात आली होती. मात्र, सध्याची परिस्थिती...7 Mar 2021 / No Comment / Read More »

गडकरींच्या पुढाकाराने पुणे मेट्रोचा मार्ग मोकळा

गडकरींच्या पुढाकाराने पुणे मेट्रोचा मार्ग मोकळा=विमातळाचाही विस्तार करणार= नवी दिल्ली, [९ सप्टेंबर] – केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे आज बुधवारी दूर करण्यात आले. त्यामुळे पुणे मेट्रोच्या कामाचा लवकरच शुभारंभ होऊ शकतो. गडकरी यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोशी संबंधित सर्व विभागांची उच्चस्तरीय बैठक बुधवारी राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात बोलावण्यात आली होती. या बैठकीला नितीन गडकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र...10 Sep 2015 / No Comment / Read More »

अजित पवार यांना राज्यात मध्यावधीची आशा

अजित पवार यांना राज्यात मध्यावधीची आशापुणे, [११ जुलै] – शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांची राज्यातील कारभाराबाबतची वक्तव्ये पाहिली तर राज्यातील सत्तेतील सहकार्‍यांचे भाजपासोबत सख्य असल्याचे दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी वेगळा विचार केला तर तो दिवस भाजपाचा राज्यातील सत्तेतील शेवटचा दिवस असेल, असे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे शनिवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नुकतेच सिंधुदुर्ग येथे शिवसेनेने स्वाभिमान दाखविल्यास राज्यात मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतील, असे विधान केले होते....12 Jul 2015 / No Comment / Read More »

प्रत्यक्षात दिसू लागला ‘मेक इन इंडियाचा’ परिणाम : मुख्यमंत्री

प्रत्यक्षात दिसू लागला ‘मेक इन इंडियाचा’ परिणाम : मुख्यमंत्रीपुणे, [११ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियासाठी जी धोरणे वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे त्याचा परिणाम आज चाकणमधील मर्सिडीज बेंझच्या विस्तारित प्रकल्पात पाहायला मिळतो आहे. ज्या वेगाने केंद्र सरकार काम करते आहे त्याच्याशी सुसंगत पावले राज्यांनी टाकायला हवी आणि महाराष्ट्र त्यात मागे नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले . उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी अनुकूल स्थिती निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा भाग आहे आणि...12 Jun 2015 / No Comment / Read More »

बिंदुमाधव जोशी कालवश

बिंदुमाधव जोशी कालवशपुणे, [१० मे] – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिंदुमाधव जोशी यांचे आज रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे. बिंदुमाधव जोशी गेले काही दिवस आजारी होते. यापूर्वी त्यांच्यावर दोनदा हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात...12 May 2015 / No Comment / Read More »

तासगावात सुमनताई पाटील विजयी

तासगावात सुमनताई पाटील विजयीसांगली, [१५ एप्रिल] – सांगलीतील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालात सुमनताई पाटील यांनी १ लाख १२ हजार ९५३ मतांनी विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादीने सुमनताई यांना उमेदवारी दिली होती आणि तासगावच्या मतदारांनीही सुमनताईंवर विश्‍वास व्यक्त करीत त्यांना भरघोस मतदान केले. आबांविषयी आदर राखत अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने आपला उमेदवार दिला नव्हता. तथापि, भाजपाचे बंडखोर उमेदवार ऍड...15 Apr 2015 / No Comment / Read More »

नवोदित साहित्य संमेलन २३ पासून तुळजापूरला

नवोदित साहित्य संमेलन २३ पासून तुळजापूरलापुणे, [१४ एप्रिल] – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेले २२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य समेलन २३ आणि २४ मे रोजी तुळजापूर येथे होणार आहे, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री लक्ष्मण ढोवळे यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, उद्‌घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, कथाकथन आदी...15 Apr 2015 / No Comment / Read More »

घुमानमध्ये घुमू लागली स्वातंत्र्य चळवळीची स्तोत्रे

घुमानमध्ये घुमू लागली स्वातंत्र्य चळवळीची स्तोत्रे=भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे कुटुंबीय येणार= पुणे, [२२ मार्च] – पंजाबच्या घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र व देशातील अनेक महोत्सव तेथे एकवटत आहेत. म्हणजे तेथे पंढरीची वारीही पोहोचत आहे, पंजाबमधील वैशाखीही साजरी होत आहे आणि भांगडाही सुरू आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेलेले शहीद भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय येथे आगामी ३ ते ५ एप्रिल दरम्यान होणार्‍या संमेलनाला उपस्थित...23 Mar 2015 / No Comment / Read More »

११ वा पं जितेंद्र अभिषेकी महोत्सव २० मार्चपासून

११ वा पं जितेंद्र अभिषेकी महोत्सव २० मार्चपासूनपुणे, [१३ मार्च] – ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आपला परिसर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ मार्च दरम्यान घरकुल लॉन्स, म्हात्रे पूल येथे हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती गायक शौनक अभिषेकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाची सुरुवात २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. तुकाराम दैठणकर यांच्या शहनाई वादनाने होईल. त्यानंतर...14 Mar 2015 / No Comment / Read More »