किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.53° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.53° से.
27.28°से. - 31.05°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलपुणे, [११ जुलै] – शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांची राज्यातील कारभाराबाबतची वक्तव्ये पाहिली तर राज्यातील सत्तेतील सहकार्यांचे भाजपासोबत सख्य असल्याचे दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी वेगळा विचार केला तर तो दिवस भाजपाचा राज्यातील सत्तेतील शेवटचा दिवस असेल, असे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे शनिवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नुकतेच सिंधुदुर्ग येथे शिवसेनेने स्वाभिमान दाखविल्यास राज्यात मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतील, असे विधान केले होते. अजित पवार यांनीही तोच मुद्दा धरून महायुतीतील मतभेदांवर टीका केली.
अजित पवार म्हणाले, राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी, जिकडे पहावे तिकडे भ्रष्टाचार दिसतोय्, अशा कानपिचक्या देत भाजपाला धारेवर धरले. शिवसेनेच्या मुख्यपत्रामध्ये भाजपाविरोधात सातत्याने बातम्या येत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री अधिकार आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याने समाधानी नसल्याचे जाहीरपणे बोलत आहेत. या घटनांवरून शिवसेना आणि भाजपाचे फारसे सख्य उरल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी वेगळा विचार केला तर तो भाजपाचा सत्तेतील शेवटचा दिवस असेल.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे समविचारी पक्ष आहेत. मागील १५ वर्षे राज्यात आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडीची सत्ता होती आणि आहे. त्यामुळे आगामी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही दोन पक्ष मिळून सत्ताधार्यांना घेरणार आहोत. यासंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील असे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बैठक घेणार आहोत. त्यामध्ये मंत्र्यांची बोगस पदवी प्रमाणपत्रे, चिक्की खरेदी, आदिवासी साहित्य खरेदी निविदांमधील भ्रष्टाचाराचे मुद्दे, शेतकर्यांच्या आत्महत्या, पीककर्ज माफी, ऊस आणि दुधाच्या दरांचा प्रश्न, एफआरपीच्या रकमेचा मुद्दा, पावसाअभावी दुबार पेरणी संकट, गारपीट आणि दुष्काळनिधी या मुद्यांवर अधिवेशनामध्ये आवाज उठविणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.