किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल=विरोधकांनी मुद्यांवर चर्चा करावी : मुख्यमंत्र्यांचे आवाहन=
मुंबई, [१२ जुलै] – कोणत्याही प्रकारच्या चर्चेला किंवा चौकशीला आम्ही तयार आहोत. मात्र, विरोधकांनी गोंधळाऐवजी मुद्यांवर चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले. विरोधकांनी जर अधिवेशन चालू दिले नाही तर, ते जनतेच्या आणि शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी असंवेदशील आहेत, असाच त्याचा अर्थ होतो, असेही ते म्हणाले.
सोमवार, १३ पासून सुरू होणार्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील खरीपाच्या पेरण्या अवर्षणामुळे धोक्यात आल्या असल्या तरी या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. दुबार पेरणीची स्थिती उद्भवल्यास बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा तयार असून शेतकर्यांना सवलतीच्या दरात ते उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. मात्र, विरोधक मागणी करत आहेत त्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफीचा कोणताही विचार सरकार करीत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. २००८ सालच्या कर्जमाफीचा शेतकर्यांना कोणताही फायदा झाला नसून, बँकांनाच फायदा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकर्यांसाठी अकराशे कोटींची एक विशेष योजना तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जाणार असून सभागृहात त्याबाबतची संपूर्ण माहिती देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
त्याचबरोबर कौशल्याधारित प्रशिक्षण योजनेच्या धोरणाची आखणी पूर्ण झाली असून, त्याबाबतही सविस्तर माहिती सभागृहात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय अपुर्या पावसाच्या संकटाचा सामना करण्यासाठी वेधशाळेच्या अंदाजावर आधारित एक योजना तयार केल्याचे सांगतानाच कृत्रिम पावसाच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार असून त्यासाठी दोन कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत व आणखी एका कंपनीने हा प्रयोग मोफत करण्याची तयारी दर्शवल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही आरोपांच्या चौकशीला तयार
मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांच्या चौकशीला आपली तयारी असून, विरोधकांनी पुरावे असल्यास ते द्यावेत, असे खुले आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर अमेरिका दौर्यादरम्यान विमानाला झालेल्या विलंबाची चौकशी केंद्रीय स्तरावरही सुरू असून, राज्य सरकारनेही चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सेवा हमी कायद्याला मंजुरी, मराठीला राजभाषेचा दर्जा देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून साकारलेला सेवा हमी कायदा या अधिवेशनात पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याविषयीची कायदेशीर तरतूद असलेले विधेयक पारित करून मराठी भाषेला अधिकृत राजभाषेचा दर्जा देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. याशिवाय शिक्षण शुल्क नियमन कायदा, महापालिका सुधारणा कायदा, सागरी मासेमारी सुधारणा विधेयक, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या सुधारणा विधेयक यासारखी १५ विधेयके या अधिवेशनात मांडण्यात येतील.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
सोमवारपासून होऊ घातलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिला. अधिवेशनाच्या पूर्व संध्येस मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार घालण्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
रविवारी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप, एमआयएम, शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष अशा सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्शवभूमीवर सरकार शेती कर्ज संपूर्ण माफ करीत नाही, तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असणार्या मंत्र्यांची हकालपट्टी केली जात नाही तोवर विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही, अशी घोषणा विरोधकांनी केली. या मुद्यांसह गिरणी कामगारांची घरे, धनगर, मराठा व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, शेतकर्यांच्या जुन्या पीक विमा कर्जाच्या न मिळालेल्या रकमा, दूध, धान, कापूस सोयाबीन आदी शेतकर्यांना रास्त भाव न मिळणे, जाहीर केलेले अनुदान, बोनस न मिळणे आदी कारणांसाठी चहापानाच्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे पत्र सर्व विरोधी पक्ष गट नेत्यांच्या सहीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचे विखे पाटील व धनंजय मुंडे यांनी सांगितले.