किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=विधान परिषद तीनवेळा तहकूब=
मुंबई, [१३ जुलै] – ऐन शोकप्रस्तावाच्यावेळी संकटात असलेल्या शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विधान परिषदेत विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा स्थगित करावे लागले. यावरून दिवंगत सदस्यांप्रती विरोधकांची असंवेदनशीलता दिसून आली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय मांडला. तसेच २८९ अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे या गंभीर विषयावर चर्चेची मागणी केली. कॉंग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनीही आधी कर्जमाफीची घोषणा करा, मगच शोकप्रस्तावार चर्चा करू असा नवाच सूर आळवला. यावेळी सरकार विरोधी घोषणा लिहिलेले फ्लेक्सचे बोर्ड फडकावत विरोधक त्यांची मागणी रेटण्याचा प्रयत्न करीत होते. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले. सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी या विषयावर सरकारची चर्चेची तयारी असल्याचे सांगत आधी शोकप्रस्तावावर चर्चा व्हावी, असे आवाहन केले. शेवटी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हस्तक्षेप करीत खडसे यांना शोकप्रस्ताव मांडण्याची अनुमती दिली.
माजी मंत्री गोविंदराव आदिक, डॉ. बळीराम वामन हिरे, प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी आमदार शांताराम पांडुरंग कळमकर, शिवाजीराव मारुतराव पाटील आदी सदस्यांना सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. सभागृह नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, प्रा.जोगेंद्र कवाडे आदी सदस्यांनी दिवंगतांच्या आठवणींना उजाळा दिला.