किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=नव्या अभ्यासातील निष्कर्ष=
लंडन, [१३ जुलै] – ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे त्यातील काही कण वातावरणात मिसळत असतात आणि या कणांच्या प्रभावामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावली आहे, असे एका ताज्या अभ्यासात दिसून आले आहे.
मोठमोठे कारखाने आणि उद्योगांमधून बाहेर पडणार्या वायुमुळे जगभरातील तापमानात वाढ झाली आहे. पण, ज्वालामुखींचे एरोसोल्स गेल्या दहा वर्षांपासून हे तापमान कमी करण्यासाठी नैसर्गिक छत्र म्हणून काम करीत आहे. या दहा वर्षांच्या काळात कारखाने व उद्योगांकडून निघणार्या वायूच्या वातावरणावर होणार्या परिणामांवर संपूर्ण जगाने लक्ष केंद्रित केले असले, तरी या एरोसोल्समुळे पृथ्वीवरील तापमानात प्रत्यक्षात तितक्या प्रमाणात वाढ झालेली नाही, असे अभ्यासकांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. स्वीडनमधील विद्यापीठाच्या नेतृत्वात केआयटी टेक्नॉलॉजीसह आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या चमूने हा अभ्यास केला आहे. ग्लोबल वॉर्मिंगची गती का मंदावली, हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघणारे कण पृथ्वीच्या वातावरणात मिसळत असल्यानेच गती मंदावल्याचे उत्तर त्यांना या अभ्यासातून मिळाले आहे.
२००८ ते २०११ या काळात जे किरणोत्सर आपल्या वातावरणात मिसळले ते ज्वालामुखीच्या एरोसोल्सचेच कण असल्याचा निष्पन्न काढण्यात आला. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावून वातावरण थंड का राहते, याचे उत्तर वातावरणाच्या बदलावरील आंतरशासकीय पथकाच्या अभ्यासातही नमूद करण्यात आले असल्याचे या अभ्यासकांचे मत आहे. तथापि, ज्वालामुखींचा वारंवार उद्रेक होऊन त्यातून निघणार्या कणांमुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावत असली, तरी ही प्रक्रिया तात्पुरती आहे. पृथ्वीवरील तापमानात वाढ होण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कारण, मोठे कारखाने आणि उद्योगांमधून वायूचे उत्सर्जन करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, असा इशाराही वैज्ञानिकांनी दिला. २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात पृथ्वीच्या उत्तरेकडील मध्य अक्षांशातील तापमानात वाढ होण्याची गती संथ असेल. त्यानंतर ही गती सातत्याने वाढत जाईल, असेही वैज्ञानिकांचे मत आहे.