किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– चंद्रकांत पाटील यांची ग्वाही,
पुणे, (०१ नोव्हेंबर) – सायबर गुन्हे कसे घडतात तसेच ते कसे टाळता येतील, याचे महत्त्वपूर्ण विवेचन संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूरलिखित ‘सायबर धोके आणि उपाययोजना’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येने अडकत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असल्याने सायबर गुन्ह्यांसंदर्भात कडक कायदे करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
एकविरा प्रकाशनतर्फे संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‘सायबर धोके आणि उपाययोजना’ या पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ऑक्टोबर महिना जागतिक स्तरावर ‘सायबर सुरक्षा प्रसार’ महिना म्हणून ओळखला जातो. हे निमित्त साधून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
पुस्तक लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण स्मार्ट असणे ही चैन नसून, काळाची गरज आहे. परंतु झटपट अर्थार्जनाच्या हेतूने काही संगणकतज्ज्ञ सायबर गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आहेत. हे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे दुधारी तलवार आहे. या तंत्रज्ञानातून निर्माण होणारा ई-कचरा, सायबर गुन्हे तसेच डिजिटल व्यसनाधिनता याची जाण समाजातील प्रत्येक घटकाला यावी याकरिता या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्याला देश सायबर सुरक्षित हवा असल्यास देशवासियांना सायबर प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांची व्याप्ती खूप मोठी असल्याने नवनवीन प्रकारचे गुन्हे-घोटाळे घडत आहेत. त्यामुळे याविषयी जनजागृती व्हावी, सायबर गुन्ह्यांविषयी कडक कायदे व्हावेत.
सामान्य जनतेसह द़ृष्टिहीन व्यक्तींनाही या गुन्ह्यांमधून धोका संभवतो. त्यामुळे अंध व्यक्तींमध्येही सायबर गुन्ह्यांविषयी जागृती होणे गरजेचे आहे, असेही डॉ. शिकारपूर म्हणाले. या पुस्तकाची ब्रेल लिपितील लवकरच प्रकाशित होणारी आवृत्ती अंध शाळांमध्ये पोहोचावी यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. शिकारपूर यांनी व्यक्त केली.