किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.53° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.53° से.
27.28°से. - 31.05°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलसांगली, [१५ एप्रिल] – सांगलीतील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालात सुमनताई पाटील यांनी १ लाख १२ हजार ९५३ मतांनी विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादीने सुमनताई यांना उमेदवारी दिली होती आणि तासगावच्या मतदारांनीही सुमनताईंवर विश्वास व्यक्त करीत त्यांना भरघोस मतदान केले.
आबांविषयी आदर राखत अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने आपला उमेदवार दिला नव्हता. तथापि, भाजपाचे बंडखोर उमेदवार ऍड स्वप्नील पाटील यांच्यासह एकूण ९ अपक्ष उमेदवार या रिंगणात उतरले होते. या सर्वांचेच डिपॉझिट जप्त झाले आहे. स्वप्नील पाटील यांना केवळ १८ हजार २७३ मते मिळाली आहे. तासगाव येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बहुउद्देशीय सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासनाने शंभरावर कर्मचारी आणि अधिकार्यांची नियुक्ती केली होती. तसेच केंद्रीय पोलिस दलाचा बंदोबस्तही त्या परिसरात ठेवण्यात आला होता.
तासगावकरांनी आपल्या लाडक्या आबांना या निकालातून आगळीवेगळी श्रद्धांजलीच वाहिली आहे.