किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 29.54° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.54° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल=राज्य सरकारचा निर्णय=
मुंबई, [१८ एप्रिल] – मंत्री किंवा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याच्या दौर्यावर गेल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांकडून मानवंदना देण्याची ब्रिटिशकालीन प्रथा कायमची बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या प्रत्येक जिल्हास्तरीय दौर्यात मानवंदना देण्याची ही प्रथा आता नेहमीकरिताच बंद करण्यात येणार आहे. कारण, यातून वेळ आणि संसाधनांचा निव्वळ अपव्ययच होत असल्याचे दिसून आले आहे, असे लोक प्रशासन मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. महत्त्वाच्या व्यक्तींना मानवंदना देण्याची पद्धत ब्रिटिशांच्या काळातील आहे. गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय यांच्या दौर्यात अशाप्रकारची मानवंदना त्या काळात दिली जात होती. तेव्हापासूनची ही पद्धत आजही कायमच आहे. अजूनही मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना त्यांच्या दौर्यात मानवंदना दिली जाते. यामुळे आधीच कमी संख्या असलेल्या राज्य पोलिसांवर ताण पडतो, असे हा अधिकारी म्हणाला.
विशेष म्हणजे, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्य पोलिसांनी यापुढे मंत्र्यांना मानवंदना देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. केवळ महत्त्वपूर्ण व्यक्तींनाच मोठ्या प्रमाणात सुरक्षा मिळते. त्यांच्या मागेपुढे पोलिसांचा लवाजमा राहत असल्याने सामान्य माणसांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सामान्यांना सुरक्षा देण्यासाठी व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत कपात करण्यात यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.