किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.53° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.53° से.
27.28°से. - 31.05°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलपुणे, [११ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियासाठी जी धोरणे वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे त्याचा परिणाम आज चाकणमधील मर्सिडीज बेंझच्या विस्तारित प्रकल्पात पाहायला मिळतो आहे. ज्या वेगाने केंद्र सरकार काम करते आहे त्याच्याशी सुसंगत पावले राज्यांनी टाकायला हवी आणि महाराष्ट्र त्यात मागे नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले .
उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी अनुकूल स्थिती निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा भाग आहे आणि आम्ही यापुढेही ते करत राहू; मात्र हे करताना राज्यातील युवकांच्या कौशल्यवाढीसाठी उद्योगांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील दुसर्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
सध्या काही भाग आयात करून येथे मोटारींची जुळणी होते आहे. भविष्यात १०० टक्के देशात तयार झालेले सुटे भाग वापरून मेक इन इंडियानुसार कार बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे साह्य सरकार करेल. उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, चाकणमधील प्रकल्प तयार आहे. मात्र पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली नाही, असे आम्ही जर्मनीच्या दौर्यावर असताना कळल्यानंतर अवघ्या दोन दिवसात केंद्रीय पर्यावरण खात्याकडून ती मिळवण्यात आली आणि तसे पत्र भारतात परतण्याआधी आम्ही कंपनीच्या वरिष्ठांना दिले. यावरून आमची उद्योगाप्रती असलेली बांधिलकी लक्षात येते. गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाल्याचा हा परिणाम आहे.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खात्यातर्फे मंजुरीचे नियम कसे सोपे आणि सुटसुटीत केले जात आहेत, याची माहिती दिली. कार्यक्रमाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, आमदार संजय भेगडे, आमदार सुरेश गोरे हेही उपस्थित होते.
उत्पादन क्षमतेत वाढ
लक्झरी कार उत्पादन करणारा देशातील सर्वात मोठा कारखाना म्हणून चाकणमधील मर्सिडीज बेंझ इंडिया लिमिटेडने लौकिक मिळवला आहे, अशी माहिती देऊन व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड केर्न म्हणाले की, चाकणमध्ये आम्ही एक हजार कोटी रुपये गुंतवणूक आतापर्यंत केली आहे. आमच्या कारना असलेली मागणी वाढत आहे. उत्पादन क्षमता वर्षाला २० हजार इतकी आहे. यामुळे स्थानिक लोकाना रोजगाराच्या संधी मिळत आहेत. आमच्या जी एल ए मॉडेलचे संपूर्ण उत्पादन या प्रकल्पातून होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.