किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल=विमातळाचाही विस्तार करणार=
नवी दिल्ली, [९ सप्टेंबर] – केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे आज बुधवारी दूर करण्यात आले. त्यामुळे पुणे मेट्रोच्या कामाचा लवकरच शुभारंभ होऊ शकतो.
गडकरी यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोशी संबंधित सर्व विभागांची उच्चस्तरीय बैठक बुधवारी राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात बोलावण्यात आली होती. या बैठकीला नितीन गडकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर, केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. अनिल शिरोळे, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा. श्रीरंग अप्पा बारणे, यांच्यासह पुण्यातील आमदार आणि शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रोच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला आणि राज्य सरकारने केंद्र सरकारला सादर केला होता. त्यानंतर दिल्ली मेट्रोने पुण्याच्या मेट्रोबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. या अहवालात काही जुजबी सुधारणा करून मेट्रोच्या कामाला मंजुरी देण्यात आली. पुण्यात काही भागात अंडरग्राऊंड, तर काही भागात एलिव्हेटेड मेट्रो चालवली जाणार आहे. बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.
पुणे मेट्रोचा प्रकल्पखर्च ११ हजार कोटी रुपये असून, यातील १० टक्के हिस्सा पुणे मनपाचा तर, प्रत्येकी २० टक्के वाटा राज्य आणि केंद्र सरकारचा राहणार आहे. उर्वरित ५० टक्के पैसे बाजारातून उभे करावे लागणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
पुणे विमानतळाच्या विस्तारालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विमानतळाच्या विस्तारासाठी लागणारी १० एकर जमीन लष्कराच्या ताब्यात आहे. ही जमीन लष्कराकडून लीजवर घेतली जाणार आहे. याशिवाय एका खाजगी व्यक्तीची २५ एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. त्यादृष्टीने अभ्यास सुरू असल्याचे बापट यांनी सांगितले. पुणे विमानतळावरून दररोज विमानाच्या ९३ फेर्या होतात, प्रवाशांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे या विमानतळाचा विस्तार आवश्यक असल्याचे बापट यांनी सांगितले.
पुणे रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्गासंदर्भातही बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.