|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.44° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 7.08 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.5°C - 30.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.55°C - 28.72°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.46°C - 28.13°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.74°C - 27.94°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.86°C - 28.12°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

26.03°C - 28.21°C

scattered clouds
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महाराष्ट्र फॅक्टरी ऑफ ग्लोब : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र फॅक्टरी ऑफ ग्लोब : देवेंद्र फडणवीस

=जपानमधील उद्योगांना राज्याचे निमंत्रण=
Devendra-Fadnavis6मुंबई, [९ सप्टेंबर] – समृद्ध लोकशाही आणि त्यासोबतच भविष्यात मोठ्या संख्येने उपलब्ध होणारी तंत्रकुशल तरुणाई यामुळे भारतासोबतच महाराष्ट्रही फॅक्टरी ऑफ ग्लोब होण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहे, असा आत्मविश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, ९ सप्टेंबर रोजी ओसाका (जपान) येथे व्यक्त केला.
जपान दौर्‍याच्या आजच्या पहिल्या दिवशी ओसाका येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि जपानमधील जेट्रो उद्योगसमूह यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य गुंतवणूक प्रोत्साहन चर्चासत्रात (महाराष्ट्र स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सेमिनार) मुख्यमंत्री अध्यक्षीय समारोपात बोलत होते.
या चर्चासत्रात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, जेट्रोचे महासंचालक हिरोकी मत्सूमोटो, जेट्रो मुंबईचे महासंचालक टाकेहिको फुरूकावा आदी सहभागी झाले होते. यावेळी एमआयडीसी आणि जेट्रोकडून गुंतवणूकीबाबत सादरीकरण करण्यात आले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्य सरकारने जगभरातील उद्योगांसाठी सहर्ष स्वागताची भूमिका घेतली असून या उद्योगांच्या राज्यातील गुंतवणुकीसाठी असलेले प्रशासकीय अडथळे दूर केले आहेत. उद्योग उभारणीसाठी लागणार्‍या परवानग्यांची संख्या ७६ वरून २५ इतकी कमी करण्यात आली असून सर्व प्रक्रिया अतिशय सुलभ व सहज करण्यात आली आहे. स्वयंप्रमाणिकरणाच्या माध्यमातून राज्यात उद्योगसुलभता आणण्यात आली आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची ही सर्वाधिक योग्य वेळ आहे. औद्योगिक क्षेत्रातील जपानच्या यशोगाथेने आम्ही प्रभावित झालो असून त्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या देशातही औद्योगिक परिवर्तनास सुरुवात केली आहे.
ओसाका येथील कन्साई आर्थिक परिषद आणि ओसाका चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यात ओसाका चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय समितीचे अध्यक्ष आणि मारूबेनी कॉर्पोरेशनचे (ओसाका) महाव्यवस्थापक मसाशी हासिमोटो तसेच कन्साई आर्थिक परिषदेच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेचे उपाध्यक्ष योशिमासा ओहाशी यांनी सहभाग घेतला. ओसाका हे कन्साई प्रांतातील मध्यवर्ती शहर असून जपानमधील प्रमुख उत्पादन केंद्र आहे. या प्रांताची अर्थव्यवस्था सुमारे ८०० अब्ज डॉलर्सची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान भेटीनंतर या प्रांताशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्यासह जागतिक भागीदारीसाठी या फोरमच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी व्हिजीट महाराष्ट्र बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट परिसंवादामध्येही मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या मदतीने (जायका) अजिंठा आणि वेरूळ येथे विकसित करण्यात आलेल्या टुरिस्ट सेंटरची माहिती दिली. येथे पहिल्या टप्प्यातील सुविधांची कामे पूर्ण केल्यानंतर जायकाच्या माध्यमातून समतोल पायाभूत सुविधा आणि अन्य विकासाबाबत सहकार्य वाढविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लेण्या, समुद्रकिनारा, गड-किल्ले, वन-वन्यजीवांबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच जपानी पर्यटकांनी राज्याला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
भारत पुरवठादार साखळी परिषदेचे (इंडिया सप्लाय चेन कॉन्फरन्स) मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. तसेच ओसाका पोर्ट प्रमोशन असोशिएशनतर्फे आयोजित चर्चासत्रातही उद्योजकांना मार्गदर्शन केले. जपानमधील पुरवठादार साखळी व्यवस्थापनविषयक समूहांसाठी महाराष्ट्रात नव्या संधी उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. राज्यात सार्वजनिक-खाजगी क्षेत्रासह रेल्वेच्या सहकार्याने नवीन बंदरांच्या विकासासाठी करण्यात येणार्‍या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी बंदर विकासाबाबतच्या चर्चासत्रात दिली.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज कृषी उत्पादन क्षेत्रातील नामांकित कंपनी कुबोटाचे यूईची (केन) किटाओ यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच डायकिन एअर कडिंशनिंग इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिओ नाकानो आणि जुनिची ओमोरी यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे आज जपानच्या चार दिवसांच्या दौर्‍यासाठी ओसाका शहरात आगमन झाले. जपानमधील भारताच्या राजदूत दीपा गोपालन वाधवा यांनी त्यांचे स्वागत केले.

Posted by : | on : 10 Sep 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g