किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलदुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयास विरोध,
पुणे/ सांगली, ८ एप्रिल – राज्य सरकारने लावलेल्या कोरोनासंबंधी कडक निर्बंधांचा निषेध करीत पुणे, सातार्यातील व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी हाती फलक घेत सरकारविरोधात ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊनसे मरेंगे हम’ अशा स्वरूपाची घोषणाबाजी केली.
पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकीज ते क्वार्टर गेट या अडीच किमीच्या परिसरात ८ ते १० हजार व्यापारी रस्त्याच्या दुतर्फा हाती फलक घेऊन उभे होते. आम्हाला विरोधकांची फूस नाही. आठवड्याच्या शेवटी टाळेबंदी मान्य आहे. मात्र, पूर्णपणे दुकाने बंद ठेवण्यास विरोध असल्याची भूमिका व्यापार्यांनी घेतली. सरकारने ऐकले नाही, तर उद्या शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजतापासून सर्व व्यापारी दुकाने उघडतील, असा इशारा पुणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला.
सरकारच्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचा निषेध करत असून, प्रशासनाने काही दिवस किंवा काही तास दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. सुमारे १० लाख कामगार या व्यापार्यांवर अवलंबून आहेत. शिवाय पुढील दिवसांत गुढीपाडवा यासारख्या सणांना प्रारंभ होत आहे. अशावेळी व्यवसाय बंद ठेवणे परवडणारे नसल्याची भूमिका व्यापार्यांनी यावेळी घेतली.