किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपहिलेच भारतीय शिक्षक, ७ कोटींतील ५० टक्के रक्कम ९ शिक्षकांना देणार,
सोलापूर, ३ डिसेंबर – युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ गुरुवारी जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले हे ७ कोटी रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील १४० देशांतील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले यांची घोषणा करण्यात आली आहे. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले यांनी मिळालेली रक्कम ‘टीचर इनोव्हेशन फंड’करिता वापरण्याचा निर्णय घेतला असून, या माध्यमातून शिक्षकांना नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.