किमान तापमान : 27.6° से.
कमाल तापमान : 27.86° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.07 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.86° से.
26.31°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलअर्णव गोस्वामी यांचा उच्च न्यायालयात अर्ज,
मुंबई, ३ डिसेंबर – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवावा, अशी विनंती करणारे दोन अर्ज रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि मालक अर्णव गोस्वामी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात केले. आरोपपत्राची प्रक्रिया तसेच तपास हस्तांतरित करण्याबाबत हे अर्ज आहेत.
अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन देण्यात आला आहे.
अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी व अन्य दोन जणांना रायगड पोलिस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. या कारवाईवरून प्रचंड गदारोळ माजला होता.
अलिबाग न्यायालयाकडून तातडीने सुनावणीस नकार मिळाल्याने त्यांनी लगेचच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर अर्णव यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तिथे सुनावणी होऊन अर्णव यांना जामीन मंजूर झाला आणि त्याचदिवशी तळोजा कारागृहातून त्यांना मुक्तही करण्यात आले. या सगळ्या पृष्ठभूमीवर अर्णव यांनी आज दोन महत्त्वाचे अर्ज मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहेत.
‘एनसीबी’चे दोन अधिकारी निलंबित
अभिनेत्री दीपिका पदुकोण, विनोदी अभिनेत्री भारतीसिंह आणि दीपिकाची माजी व्यवस्थापक करिष्मा प्रकाश यांची चौकशी करणार्या मादकपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) दोन अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. शिवाय या दोन्ही अधिकार्यांची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील मादकपदार्थ प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळे अनेक कलाकारांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे देखील समोर आले. याप्रकरणी एनसीबी कसून चौकशी करीत आहे.
भारतीसिंह आणि तिचा पती हर्षला मादकपदार्थांच्या सेवनाप्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, जामिनासंदर्भात संबंधित अधिकार्यांनी परिणाकारक रीत्या काम केले नाही. शिवाय हे दोघे न्यायालयात देखील उपस्थित राहिले नाहीत. आरोपींना मदत केल्याचा देखील त्यांच्यावर संशय आहे. त्यामुळे अधिकार्यांना निलंबित करण्यात असून, याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येणार आहे.