किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
26.84°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलमुंबई, ३ डिसेंबर – भाजपाच्या अमरिश पटेल यांनी कॉंग्रेसच्या अभिजित पाटील यांचा दारुण पराभव केला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार अमरिश रसिकलाल पटेल विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित मोतीलाल पाटील यांचा पराभव केला. पटेल यांना ३३४, तर पाटील यांना ९८ प्रथम पसंतीची मते मिळाली तर, चार मते अवैध ठरली. दरम्यान, राज्यातील पाच पदवीधर-शिक्षक मतदार संघात सुरू असलेल्या मतमोजणीत सत्तारुढ महाविकास आघाडी आणि भाजपा तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत दिसून आली.
धुळे-नंदुरबार या भागात कॉंग्रेसचा प्रभाव आहे. अमरिश पटेल हेसुद्धा मागील विधानसभा निवडणुकीपर्यंत कॉंग्रेसचेच नेते होते.
दरम्यान, राज्य विधान परिषदेतील पाच पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीला आज गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. पुणे येथे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही, तसेच नागपूर, औरंगाबाद येथे पदवीधर, अमरावती येथे शिक्षक मतदार संघात १ डिसेंबर रोजी मतदान झाले. मतपत्रिकांद्वारे हे मतदान घेण्यात आले असल्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेला विलंब होत आहे.
अभिजित वंजारी आघाडीवर
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत विलंबाने सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा निकाल यायला सायंकाळचे ७ वाजले. दुसर्या फेरीअखेर कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. अभिजित वंजारी यांनी मोठी आघाडी घेतली होती. या नागपूर पदवीधर निवडणुकीत ६४.३८ टक्के मतदान झाले होते. पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. अभिजित वंजारी यांना १२ हजार ६१७ तर भाजपाचे संदीप जोशी यांना ७ हजार ७६७ मते मिळाली. पहिल्या फेरीत २,२३४ मते अवैध ठरली. या निवडणुकीच्या रिंगणात १९ उमेदवार होते. दुसर्या फेरीअखेर अभिजित वंजारी यांना २४,११४ व संदीप जोशी यांना १६,८५२ मते मिळाली होती. अवैध मतांची संख्या वाढून ४,७६९ झाली होती.
अमरावतीत अटीतटीची लढत
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअंती अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये वाशीमचे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर असून महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे दुसर्या व अपक्ष शेखर भोयर तिसर्या स्थानावर आहे. विजयासाठी १४ हजार ९१६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. दोन फेर्यांमध्ये पहिल्या पसंतीची वैध मते मोजण्यात आली. त्यामध्ये किरण सरनाईक ६ हजार ८८ मते घेऊन पहिल्या स्थानावर राहिले. महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे ५ हजार १२२ मते घेऊन दुसर्या तर अपक्ष शेखर भोयर ४ हजार ८८९ मते घेऊन तिसर्या स्थानावर होते. भाजपाच्या डॉ. नितीन धांडे यांना २ हजार १२७ मते मिळाली होती. या निवडणुकीत २७ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले. हे वृत्त लिहीत असताना चित्र स्पष्ट झाले नव्हते.
पुण्यातील शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे जयंत आजगावकर हे आघाडीवर होते. दुसर्या स्थानावर विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत होते. पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा हजार मतांनी पुढे होते. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपाचे संग्राम देशमुख माघारलेले होते.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघात पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी २७ हजार ८७९ मतांसह आघाडी घेतली होती. भाजपाचे शिरीश बोराळकर यांना १० हजार ९७३ मते मिळाली होती.