किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 27.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 73 %
वायू वेग : 3.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
25.99°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलमुंबई, ४ डिसेंबर – विधान परिषदेच्या सहा जागांवर झालेल्या निवडणुकीत चार जागांवर महाविकास आघाडी सरकारने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपाला धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था या एकाच जागेवर विजय मिळवता आला.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला झाली. तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एका धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक झाली होती.
आघाडीच्या वतीने औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी तिसर्यांदा विजय मिळवून, आपली जागा राखली. पुणे शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसचे जयंत आसगाकर यांनी विजय मिळविला असून, पुणे पदवीधर मतदारसंघात राकॉंचे अरुण लाढ विजयी झाले. भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ अशी ओळख असलेल्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपाला गमवावे लागले आहेत. नागपूर मतदारसंघात भाजपाचे संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, अमरावतीच्या एका जागेवर लढलेल्या शिवसेनेला तीन पक्षांचे पाठबळ असूनही जागा राखता आलेली नाही. येथे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे.
भाजपाचे अमरिश पटेल यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार अभिजीत पाटील यांना पराभूत केले. अमरीश पटेल यांना केवळ वर्षभराचा कालावधी मिळणार आहे.