किमान तापमान : 26.25° से.
कमाल तापमान : 26.76° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 63 %
वायू वेग : 4.07 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.25° से.
25.99°से. - 30.93°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
रविवार, 24 नोव्हेंबर कुछ बादलमुंबई, ६ डिसेंबर – ज्येष्ठ मराठी अभिनेते रवि पटवर्धन यांचे आज रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केले आहे. ‘अगबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.
१९८० च्या दशकात त्यांनी तेजाब आणि अंकुश यासारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती. श्वसनाचा त्रास झाल्यानंतर त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका बसला.
त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांचे पुत्र निरंजन पटवर्धन यांनी वृत्तसंस्थेला दिली. त्यांच्या मागे एक पत्नी, तीन मुले आणि चार नातू असा परिवार आहे.
१९४४ मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी पटवर्धन यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केले होते. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक पटवर्धन यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींसोबत केले. त्यात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर वयाच्या ८२व्या वर्षातही या नाटकात ते धृतराष्ट्राची भूमिका करीत होते.
सध्या ते झी मराठीवरील ‘अगबाई सासूबाई’ या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहम्च्या आजोबांची भूमिका साकारत होते. फार कमी वेळात पटवर्धन यांनी साकारलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते.
त्यांनी सुमारे २०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात यशवंत या हिंदी चित्रपटाचा आणि अशा असाव्या सून, उंबरठा, झंजार, ज्योतिबा फुले यासारख्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.