किमान तापमान : 26.65° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.71°से. - 31.14°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, ६ डिसेंबर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उशिरा का होईना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे महत्त्व समजले. त्यांनी पाहणी करून, कामाचा आढावा घेतला, याचा आनंद आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्र कसा बदलू शकतो, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना झाली, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी चिमटा काढला.
या महामार्गामुळे राज्याचा मागास भाग मुंबईशी जोडला जाऊ शकतो, हे आम्ही अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने त्यावेळी समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. आता हा पक्ष बाजूने आहे, याचे समाधान आहे. असे फडणवीस म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करताना फडणवीस म्हणाले की, एकवीसाव्या शतकात भारत जी प्रगती करीत आहे, त्याचे श्रेय संविधानालाच जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाचे आहे. जात पंचायतीविरोधात महाराष्ट्राने कायदा तयार केला आहे. समाजात चुकीच्या प्रवृत्ती बाजूला ठेवायला हव्या. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमरावतीचा दौरा करून, समृद्धी महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचेच कौतुक केले. फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचा मुद्दा चांगलाच तापला होता. शिवसेनेने या महामार्गाला अनेकदा विरोध केला होता. मात्र, तो झुगारून फडणवीस सरकारने महामार्गाचे काम सुरूच ठेवले होते. शिवसेनेने समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नामकरण करण्याची मागणी केली होती, ती मान्यही करण्यात आली होती.