|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.99° से.

कमाल तापमान : 29.22° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 42 %

वायू वेग : 3.76 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.99° से.

हवामानाचा अंदाज

26.53°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.12°से. - 30.05°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.19°से. - 29.98°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.2°से. - 29.96°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.23°से. - 29.78°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.26°से. - 29.34°से.

रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » महाराष्ट्र » राज्यपालांनी चार आकांक्षित मागास जिल्ह्यांच्या प्रगतीचा घेतला आढावा

राज्यपालांनी चार आकांक्षित मागास जिल्ह्यांच्या प्रगतीचा घेतला आढावा

वर्ग ३ ची रिक्तपदे भरण्याच्या सूचना,
मुंबई, ८ डिसेंबर – राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या ४ आकांक्षित जिल्ह्यांनी २०१८ च्या तुलनेत मानव निर्देशांकात प्रगती करून आपले एकूण मानांकन सुधारल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मंगळवारी समाधान व्यक्त करताना संबंधित जिल्हाधिकार्‍यांना कौतुकाची थाप दिली.
विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेताना राज्यपालांनी सर्व आकांक्षित जिल्ह्यांना वर्ग ३ ची पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.
वर्ग ३ ची पदे रिक्त राहिलीत तर त्याचा विविध सेवांवर, विशेषतः आरोग्यसेवा क्षेत्रावर विपरीत परिणाम होतो, असे सांगून जिल्हाधिकार्‍यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करावे, आपणही त्यात लक्ष घालू, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांशी राज्यपालांनी मंगळवारी आभासी चर्चा करून जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीचा अहवाल राष्ट्रपतींना नियमितपणे सादर करावा लागतो, याकरिता राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंसाधन, आर्थिक समावेशन व कौशल्य विकास तसेच पायाभूत सुविधा या निर्देशांकांवर आकांक्षित जिल्ह्याने काय प्रगती केली, याची विस्तृत माहिती राज्यपालांनी घेतली.
नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन यांनी विविध क्षेत्रातील जिल्ह्यांच्या प्रगतीची माहिती दिली.

Posted by : | on : 9 Dec 2020
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g