किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, ७ मार्च – २६ ते २८ मार्च या कालावधीत नाशिक येथे होऊ घातलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. कोरोना प्रार्दुभावाच्या पृष्ठभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. आता हे संमेलन मे महिन्यात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संमेलनासाठी जवळपास सर्व तयारी झाली होती. अनेक साहित्यिकांना निमंत्रणे पाठविण्यात आली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता आम्ही राज्यातील साहित्य संस्थांशी चर्चा केली. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. त्या पृष्ठभूमीवर नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा आभासी पद्धतीने घ्यावे, अशी भूमिका साहित्यिक तसेच नाशिकमधील नागरिकांनी घेतली. नाशिकमध्येदेखील कोरोना संसर्ग वाढत आहे. यामुळे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
संपूर्ण भारतातून येणार्या साहित्यिकांसह निमंत्रित लेखक, कवी यांच्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून मोठ्या प्रमाणात येणार्या साहित्यप्रेमींच्या सुरक्षिततेचा विचार करून आणि ९४ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्याशी चर्चा करून सदर निर्णय घेण्यात आला.
साहित्य संमेलन जरी स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला, तरी नव्या तारखांसह भविष्यात होणार्या संमेलनासाठी संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.