किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलएटीएसच्या तपासाला वेग,
मुंबई, ७ मार्च – राज्य सरकारने मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवला असतानाच त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरून हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएस पथकाने आज मनसुख हिरेन यांच्या घरी कुटुंबीयांचे बयाण नोंदवून घेतले. साडेतीन तास बयाण नोंदवल्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. एटीएस प्रमुख शिवदीप लांडे यांनी सहकार्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. संपूर्ण घटना समजून घेऊन गुन्हा कशाप्रकारे घडला असावा, याबाबतचे काल्पनिक दृश्यनिर्मिती केली जाणार आहे. याशिवाय घटनेच्या दिवशी घरातून निघाल्यानंतर मनसुख कुठे कुठे गेले, ते कुणाच्या संपर्कात आले, याचाही शोध घेत असल्याचे एटीएस अधिकार्यांनी सांगितले.
जिलेटिन कांड्या, वाहनाची न्यायवैद्यक तपासणी होणार
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेली संशयास्पद वाहन जीप आणि त्यातील २० जिलेटिन कांड्या अधिक तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळाकडे पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. न्यायवैद्यक परीक्षण वाहन चालवणार्या व्यक्तीचे केस, त्याचा स्पर्श वा अन्य बाबीद्वारे होऊ शकते. सामान्य पृथकरण विभाग, डीएन आणि भौतिकशास्त्र विभागाकडून यासंबंधीची सखोल चौकशी आणि तपासणी केली जाईल. प्रयोगशाळाकडून येत्या आठवड्यात पोलिसांच्या हाती अहवाल येऊ शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.