किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलतिजोरीत १ लाख ५६ हजार कोटींची तूट, ५ लाख २० हजार कोटींचे कर्ज, आर्थिक पाहणी अहवालातील सत्य,
मुंबई, ५ मार्च – जागतिक महामारी कोरोनाच्या कहराने जगासोबतच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही जबरदस्त फटका बसल्याचे विदारक सत्य आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. राज्याची अर्थव्यवस्था तब्बल १ लाख ५६ हजार कोटींच्या तुटीने कोलमडली असून, उणे ८ टक्के दराने अर्थव्यवस्थेची वाटचाल होत असल्याची चिंता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केली.
आज शुक्रवारी विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेत शंभुराज देसाई यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची विदारक परिस्थिती पुढे आली.
राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असताना, शेती क्षेत्राने मात्र या कोरोना महामारीच्या संकटात ११.७ टक्के दराने भरीव वृद्धी केल्याचे समाधान असले तरी, उद्योग व सेवा क्षेत्राची मात्र वाताहात झाल्याचे या अहवालातून पुढे आले आहे.
केंद्राने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी दिला
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०१८-१९ पासून सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दोन हजार प्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी एकूण ६ हजार रुपये अनुदान लागूू असून, ते लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत ४ जानेवारीच्या अखेरीस राज्यातील १०२.५४ लाख लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात एकूण ९,४९६.३८ कोटी रक्कम जमा करण्यात आल्याचे राज्य सरकारने आपल्या अहवालात मान्य केले आहे.
दरडोई उत्पन्नातही पीछेहाट
राज्याची दरडोई उत्पन्नातही पीछेहाट झाली असून, देशात पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र असल्याचे दिसून आले आहे. हरयाणा, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू यानंतर महाराष्ट्राचे वार्षिक दरडोई उत्पन्न २ लाख २ हजार १३० रुपये इतके आहे. तर राज्यावर तब्बल ५ लाख २० हजार ७१७ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या उत्पन्नात १ लाख ५६ हजार कोटींची तूट झाल्याचे नमूद केले आहे. आर्थिक पाहणी अहवालात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेची वाटचाल उणे ८ टक्के तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचालही उणे ८ टक्के अपेक्षित असल्याचे दाखविण्यात आली आहे. तर उद्योगात उणे ११.३ टक्के आणि सेवा क्षेत्रात उणे ९ टक्के अशी वाटचाल दाखविण्यात आली आहे.