किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
26.84°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल‘एमईआरसी’चा महत्त्वपूर्ण निर्णय; ग्राहकांना मोठा दिलासा,
मुंबई, ४ मार्च – राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अर्थात् एमईआरसीने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२१ पासून वीजदर सुमारे दोन टक्के कमी करण्यात येणार आहेत. देशात एकीकडे इंधन दरवाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी (इंधन समायोजन कर) निधीच्या माध्यमातून वीज कंपन्यांना निधीचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत.
एमईआरसीने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२० मध्ये या इंधन समायोजन कराच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याची सुरुवात झाली. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी १० टक्के वीजदर कमी करण्यात आले. या वर्षी १ एप्रिलपासून ते संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीजदर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून एक टक्के तर नॉन रहिवासींसाठी कंपनी, उद्योग यांना २ ते ५ टक्के वीजदर कमी करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत.