किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.87° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.87° से.
26.31°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलमुंबई, ४ मार्च – राममंदिरासाठी देणगी घेण्याचा ठेका भाजपने घेतला आहे का? असे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेत पटोले यांच्यावर हल्ला चढवला. ज्यांना खंडणी वसूल करण्याची सवय आहे. त्यांना समर्पण कळणार नसल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले, त्यावेळी भाजपाच्या सदस्यांनी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने सभागृह दणाणून सोडल्याने, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
कॉंग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उभे राहून सांगितले की, एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सांगितले काही लोकं राममंदिराची देणगी मागण्यासाठी माझ्याकडे आले असता, मी त्यास नकार दिला. त्या व्यक्तीने मला धमक्या देणे सुरू केले. भाजपाला देणगी घेण्याचा ठेका दिला आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत खंडणी वसूली करणार्यांना समर्पण कळणार नसल्याची जोरदार टीका केली. नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी ‘जय श्रीराम’चा जयघोष करायला सुरुवात केली.
यावेळी फडणवीसांनी आक्रमक होऊन विधानसभा उपाध्यक्षांना विचारले की, ही राममंदिरावर चर्चा चालली आहे का? राममंदिरावर जर चर्चा करायची हिम्मत असेल, तर यासदर्भात स्वतंत्र चर्चा लावा, असे आव्हान त्यांनी दिले. १० मिनिटांनंतर कामकाज पूर्ववत सुरू झाले तेव्हा, फडणवीसांनी दिलेले आव्हान कोणीही स्वीकारू शकले नाही. नाना पटोल यांनी मौनच ठेवले.