किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.58°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलवनमंत्रालयाचा कार्यभार उद्धव ठाकरे यांच्याकडे,
मुंबई, ४ मार्च –
पूजा चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणात गाजत असलेले वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आज गुरुवारी अखेर मंजूर झाला. मुख्यमंत्र्यांच्या खिशात ५ दिवस राहिलेला राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ५ मिनिटांत मंजूर केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आणि सदर खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे द्यावा, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना या वेळी केली होती. त्याअनुषंगाने राठोड यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. राठोड यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी केली जात होती. भाजपा नेत्यांनी या प्रकरणातील अनेक पुरावे जनतेसमोर उघड केले होते. तरीही मुख्यमंत्री ठाकरे त्यांना पाठिशी घालत होते. या काळात वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही राठोड यांनी केला. अखेर तब्बल २० दिवसांनंतर रविवारी, विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला. या राजीनाम्याचे काय करणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला असता तो फ्रेम करण्यासाठी ठेवलेला नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा आपल्याकडेच ठेवला होता.
राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविलाच गेला नसल्याचे लक्षात येताच भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली. आमदार ऍड. आशिष शेलार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर सभागृहातच सरकारची चिरफाड केली.
त्यातच कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. तशी एक व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांत फिरू लागली. त्याबरोबर जारकीहोळी यांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ठाकरे यांच्यांवरील दबाव वाढला आणि त्यांना राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवावा लागला. आज दुपारी त्यांनी तो राजभवनाकडे पाठविला आणि राज्यपालांनी तो लगेचच मंजूर केला. सध्या हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असल्याने आता यावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.