|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 25.99° से.

कमाल तापमान : 26.94° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 69 %

वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

25.99° से.

हवामानाचा अंदाज

25.99°से. - 31°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.73°से. - 29.76°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.81°से. - 29.63°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.54°से. - 29.57°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.84°से. - 29.35°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.78°से. - 28.96°से.

रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » महाराष्ट्र » खंडणीखोरांना समर्पण निधी कसा समजणार : फडणवीस

खंडणीखोरांना समर्पण निधी कसा समजणार : फडणवीस

मुंबई, ३ मार्च – राममंदिर समर्पण निधीवर शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जाते, पण खंडणीखोरांना समर्पण निधीतील भाव समजणार तरी कसा, असा सवाल उपस्थित करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढविला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिल्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना, मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र ते येऊ शकले नाही. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. मात्र, महाराष्ट्राबाबत ते बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले. पूर्वी ते नवीन होते, पण चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजले नाही. शेतकर्‍यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. राज्यातील लाखो शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या मुख्यमंत्र्यांना सिंघु सीमेवरील शेतकर्‍यांची चिंता आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भारतीय सैनिकांचा अपमान केला. ‘चीन समोर आले की पळे’ असे म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांचा मोठा अपमान केला. उणे ३० अंश तापमानात शत्रूचा मुकाबला करून चीन सैनिकांना मागे धाडणारे आपले शूर सैनिक आहेत. त्यांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळाले नाही, असे सांगताना सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलो आहोत, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो. सावरकर यांच्याबाबत ही टिपणी कॉंग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. यातूनच त्यांचे सावरकरप्रेम दिसून येते, असेही फडणवीस म्हणाले.
डॉ. हेडगेवार स्वातंत्र्यसैनिक होते
शिवसेना स्वातंत्र्य संग्रामात नव्हती, हे त्यांनी सांगितले, हे बरेच केले. स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता, असे मुख्यमंत्री सांगतात. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार स्वत: स्वातंत्र्यसैनिक होते. भाजपाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी बलिदान दिले, हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे, असा टोलाही त्यांनी काढला.

Posted by : | on : 4 Mar 2021
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g