किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 3.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.23°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, ३ मार्च – आणिबाणी लादणे ही माझ्या आजीची अर्थात् इंदिरा गांधींची मोठी चूक होती, असे वक्तव्य करणारे कॉंगे्रसचे खासदार राहुल गांधी यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बुधवारी जोरदार चिमटा काढला. आजीच्या कृत्यासाठी त्यांनी माफी मागितली, पण त्यांनी स्वत: केलेल्या असंख्य गंभीर चुकांसाठी ते केव्हा माफी मागणार आहेत. त्यांच्या चुकांची यादी इतकी मोठी आहे की, माफी मागता-मागता ते थकून जातील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करताना राहुल गांधी यांनी आणिबाणीवर मत व्यक्त केले. आजीने लादलेली आणिबाणीही चुकीची होती, हे त्यांनी आता मान्य केले. मात्र, मागील काही वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जे चुकीचे, तथ्यहीन आणि तिरस्करणीय आरोप आणि टीका केल्या, त्याबद्दल ते केव्हा माफी मागणार, त्यांनी आता त्वरित माफी मागावी, अन्यथा काही वर्षानंतर त्यांना या चुकांचीही जाणीव होईल आणि माफी मागतील. नंतर देशातील जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधी माफी मागता-मागता थकून जातील, पण त्यांच्या गुन्ह्यांची मोजणी संपणार नाही, असा जोरदार हल्ला चंद्रकांत पाटील यांनी चढविला.
आणिबाणी चूक होती, हे त्यांना आता समजले. मात्र, या काळात अनेक लोकांचे जीव गेले, कॉंगे्रसने ज्या प्रकारे लोकशाहीची हत्या केली, ते माफ करण्यासारखे आहे का, इंदिरा गांधी यांना विरोध करणार्या लाखो लोकांना कारागृहात डांबण्यात आले, असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हजारो लोकांचा कारागृहातच मृत्यू झाला, याविषयी राहुल गांधी काही बोलतील का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
गुजरात दंगली ही गोध्राकांडाची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदी गुजरात दंगलींसाठी माफी मागतील का, अशी विचारणा कॉंगे्रसचे काही लोक करीत आहेत. कुठलेही ठोस कारण नसताना, इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लादली होती, तर गुजरात दंगल ही गोध्रा जळीत कांडावरील संतप्त प्रतिक्रिया होती. या दोन्ही घटनांमध्ये बराच फरक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.