किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलपुणे, [१३ मार्च] – ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आपला परिसर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ मार्च दरम्यान घरकुल लॉन्स, म्हात्रे पूल येथे हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती गायक शौनक अभिषेकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाची सुरुवात २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. तुकाराम दैठणकर यांच्या शहनाई वादनाने होईल. त्यानंतर पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘त्रिवेणी संगम’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गायक आनंद भाटे, शौनक अभिषेकी आणि राहुल देशपांडे यांचा सहभाग असणार आहे.
२१ मार्चला पं. अभिषेकी यांचे शिष्य हेमंत पेंडसे यांचे गायन होईल. त्यानंतर सतारवादक पं. शुभेंद्र राव व सास्कीया राव हे सतार व चेलो यांची जुगलबंदी सादर करतील. तर शेवटी गायक रूपकुमार राठोड यांचे गायन होईल. शेवटच्या दिवशी दोन सत्र असतील. सकाळी ९.३० युवा संमेलन होणार आहे. यामध्ये ‘युवोन्मेष’ हा युवा गायकांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. यात मंदार गाडगीळ, हृषीकेष बडवे हे शात्रीय गायन, तर अमृता गायकवाड सतारवादन सादर करेल. संध्याकाळी ६ वाजता सुरुवातील गायिका कल्पना झोकरकर यांचे गायन व नंतर सिंथेसायझर वादक अभिजित पोहनकर व व्हायोलिन वादक दीपक पंडित यांची जुगलबंदी होणार आहे. महोत्सवाची सांगता पर्कशन वादक उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या सादरीकरणाने होणार आहे.
दरम्यान, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने ज्येष्ठ गायकाला दिला जाणारा पं. जितेंद्र अभिषेकी-ज्येष्ठ गायक पुरस्कार’ पं. प्रभाकर कारेकर यांना जाहीर झाला आहे. तसेच पं. जितेंद्र अभिषेकी युवा पुरस्कार’ युवा गायक हृषीकेष बडवे याला देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. सनमानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.