किमान तापमान : 29.42° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.41 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.28°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश=इंदू मिलमध्ये डॉ बाबासाहेबांचे स्मारक=
मुंबई, [१२ मार्च] – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाचे १४ एप्रिलला म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय वस्त्रोेद्योगमंत्री संतोष गंगवार यांनीही येण्याचे आश्वासन दिल्याचे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी येथे सांगितले.
मुंबईतील दादर परिसरात इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक व्हावे यासाठी आंबेडकरी संघटनांनी गेली कित्येक वर्षे लढा दिला असून अखेरीस दोन वर्षांपूर्वी संघटनेच्या लढ्याला यश आले.
आघाडी सरकारने इंदू मिलमध्येच बाबासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली. मात्र, घोषणा होऊन दोन वर्षे उलटली तरी स्मारकाच्या भूमिपूजनाचा निर्णय काही झाला नाही. मात्र, गुरुवारी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी १४ एप्रिल रोजी स्मारकाचे भूमिपूजन होईल, अशी माहिती दिली. स्मारकाच्या रूपात आंबेडकरी अनुयायांना महामानवाच्या जयंतीदिनी ही एक मोठी भेट मिळणार आहे, हे विशेष.