किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.53 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
27.28°से. - 31.31°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, [१३ मार्च] – मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यातही मेक इन महाराष्ट्र मिशन राबविण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत राज्यात होणारी औद्योगिक गुंतवणूक वाढवून विकासास चालना मिळावी यासाठी व्यवसाय सुलभता हे धोरण राबविण्यात येत आहे. सध्या नवीन उद्योगांसाठी जवळपास ७० प्रकारची परवानगी घ्यावी लागते. उद्योगासाठी एका सक्षम प्राधिकरणाकडून परवानगी घेतल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील उद्योगांना पुन्हा दुसर्या प्राधिकरणाच्या परवानगींची गरज भासू नये यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३१३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
महानगरपालिका अधिनियम कलम ३१३ मधील तरतुदीनुसार महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय महापालिका क्षेत्रात नव्याने कारखाना स्थापना करता येत नाही, तसेच नूतनीकरणही करता येत नाही. या तरतुदीमुळे उद्योजकांना औद्यागिक महामंडळासह महापालिकांचीही परवानगी घ्यावी लागत होती. या सार्या प्रक्रियेत कालापव्यय होण्यासह आर्थिक भारही उद्योगांना सहन करावा लागत होता. शासनाने उद्योजकांची ही अडचण ओळखून या तरतुदीत सुधारणा केली आहे. त्यानुसार राज्यातील महापालिका क्षेत्रातील औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील उद्योगांना महापालिका प्रशासनाकडून पुन्हा परवानगी घेण्याची गरज भासणार नाही.