किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.84°से. - 30.73°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल=पक्षांतर्गत कलहांवर प्रथमच केजरीवाल बोलले=
बंगळुरू, [१४ मार्च] – आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत कलहावर प्रथमच मौन तोडले असून, दिल्लीतील विजयानंतर इतर राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होऊन विजययात्रा सुरू करायला ‘आप’ म्हणजे नेपोलियन नाही, या शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विविध मुद्यांवर पक्षांतर्गत मतभेद आणि स्टिंग ऑपरेशनमुळे आपमध्ये वाद सुरू असताना, केजरीवाल मात्र बंगळुरूमध्ये निसर्गोपचार घेत आहेत. जिंदल निसर्गोपचार केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्याठिकाणी बोलताना त्यांनी आपले मत मांडले आहे. पक्षाचे जाळे इतर राज्यांमध्ये विस्तारण्याविषयी पक्षातील मतभेदांना मी नेहमीच तोंड देतो. दिल्लीतील निवडणूक जिंकली म्हणून इतर राज्यांमध्ये उमेदवार उभे करून जिंकण्याची अपेक्षा करायला आप म्हणजे नेपोलियन नव्हे. दिल्ली हे आदर्श राज्य म्हणून देशापुढे आणायचे आहे. त्यामुळे, देशातील राजकारणाचा चेहरा निश्चितपणे बदलेल. तसे झाल्यानंतर आपोआपच लोक आपकडे आकर्षित होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांमध्ये पक्षाच्या विस्तारावरूनच सध्या आपच्या नेतृत्वात वादंग माजले आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीत मात्र झपाट्याने सुधारणा होत आहे. बंगळुरूच्या ‘जिंदल नेचर क्युअर’ या निसर्गोपचार केंद्रात केजरीवाल यांच्यावर उपचार सुरू आहेत. या केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बबीना नंदकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवालांच्या प्रकृतीत आता झपाट्याने सुधारणा होत असून न खोकलता ते बोलू शकत आहेत. त्यांची रक्तशर्कराही आता नियंत्रणात असल्याचे नंदकुमार यांनी माध्यमांना सांगितले आहे. मात्र, सोमवारी रात्री दिल्लीत परतल्यानंतरही त्यांनी आपले पथ्य आणि योगासनांच्या वेळा कटाक्षाने सांभाळायला हव्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.