किमान तापमान : 27.5° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
26.31°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलमुंबई , [१५ मार्च] – राज्य पोलिस दलात १२,११५ पदे रिक्त असल्याची माहिती, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारलेल्य प्रश्नाला मिळालेल्या उत्तरातून समोर आली आहे.
अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकार कायद्याखाली महाराष्ट्र राज्य पोलिस मुख्यालयाला याबाबत विचारणा केली होती आणि राज्य पोलिस दलात एकूण किती जागा आहेत, त्यापैकी किती जागा भरण्यात आल्या व किती जागा रिक्त आहेत, अशी विचारणा केली होती. गलगली यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, राज्यात एकूण २,१९,९८६ पदे आहेत. यापैकी २,०७, ८७१ पदे भरण्यात आली असून १२,११५ जागा रिक्त असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पी. के. घुसे यांनी दिली. उपनिरीक्षकाची सर्वात जास्त म्हणजे २,७०८ पदे रिक्त आहेत. पोलिस दलात उपनिरीक्षकाची ९,६५९ पदे आहेत. यापैकी ६,९५१ पदे भरण्यात आली असून २,७०८ पदे रिक्त आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालकाच्या एकूण २५ पैकी ३ जागा रिक्त आहेत, तर विशेष महानिरीक्षकाच्या ४७ पैकी ८ जागा रिक्त आहेत. याव्यतिरिक्त उप-महानिरीक्षक, पोलिस निरीक्षक व दलातील इतर काही पदेदेखील रिक्त आहेत.
गलगली यांनी पोलिस दलात हिंदू , शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम अधिकारी किती आहेत, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर पोलिस दलात धर्माच्या आधारे नियुक्ती करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, जातीच्या आधारे नियुक्ती करण्यात येते, असे स्पष्ट करण्यात आले.