किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 27.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 73 %
वायू वेग : 3.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
25.99°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलनवी दिल्ली, [१६ मार्च] – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी कॉंगे्रसच्या सहा आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करणारे आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांना आज सोमवारी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
राजेश गर्ग यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी नेहमीच पक्षाच्या विरोधात काम केले असल्यानेच ही कारवाई करणे भाग पडले, असे आपमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. काही दिवसांपूर्वीच पक्षाने गर्ग यांना कारणेदाखवा नोटीस जारी केली होती. पक्षविरोधी कारवायांसाठी तुम्हाला निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा यात करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित करण्यात आलेले गर्ग हे दुसरे नेते आहेत. गेल्या वर्षी माजी आमदार विनोदकुमार बिन्नी यांच्यावरही हीच कारवाई करण्यात आली होती.