किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलकोलकाता, (०८ ऑगस्ट) – पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीएम नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरुवारी सकाळी त्यांच्या येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८० होते.
बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना, अशा शब्दांत पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि नंदीग्रामचे भाजपा आमदार शुवेंदू अधिकारी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांनी श्रद्धांजली वाहिली.
मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत होता. त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते. मागील वर्षी त्यांना न्यूमोनिया झाल्याने जीवनरक्षक यंत्रणेवर ठेवावे लागले होते. त्यातून ते बरे झाले होते. पण, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मीरा, मुलगा सुचेतन आणि मोठा आप्तपरिवार आहे.
भट्टाचार्य हे माकपाच्या सर्वोच्च निर्णय घेणार्या पॉलिटब्युरोचे सदस्य होते. त्यांनी २००० ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ज्योती बसू यांच्यानंतर भट्टाचार्य मु‘यमंत्रिपदावर विराजमान झाले होते. पण, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवून बंगालमधील ३४ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आणली.