किमान तापमान : 26.25° से.
कमाल तापमान : 26.76° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 63 %
वायू वेग : 4.07 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.25° से.
25.99°से. - 30.93°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
रविवार, 24 नोव्हेंबर कुछ बादलमुंबई, [१६ मार्च] – राज्यासाठी कायदे तयार करणार्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कामकाज कसे चालते याची सर्वसामान्यांना असलेली उत्सुकता आता संपली आहे. संसदेप्रमाणे विधिमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाच्या दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्याच्या कामकाजाला सोमवारपासून सुरुवात झाली. प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारपासून सभागृहातील प्रश्नोत्तराच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार असून, अध्यक्षांनी त्याची सभागृहाला माहिती द्यावी, असे सांगितले.
नागपूर येथील अधिवेशनात या कामकाजाच्या प्रक्षेपणाचा प्रयोग केला होता, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. सभागृहाच्या कामकाजाचे प्रक्षेपण होणार ही ऐतिहासिक बाब आहे. सदस्यांनी सभागृहाचे पावित्र्य राखणे ही सभासदांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सभासदांनी चांगली भाषणे करून जनतेच्या समस्या मांडाव्या, असे आवाहन अध्यक्ष बागडे यांनी केले.